डिजिटल मराठी वाचकांचे दैनंदिन वाचन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
‘सजग चॅरिटेबल ट्रस्ट’ ह्या संस्थेच्या वतीने (जिचा मी संस्थापक सदस्य आहे) आणि मराठीतील वाचनव्यवहाराच्या एक कार्यशील संशोधिका मेघना भुस्कुटे ह्यांच्या मदतीने वाचनसवयींचेएक सर्वेक्षण ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये केले गेले. हे सर्वेक्षण गुगल फॉर्म्सद्वारे केले गेले आणि समाजमाध्यमांतून ते लोकांपर्यंत पोचले. सुमारे ८५०० प्रतिसाद ह्या सर्व्हेला मिळाले. मराठी वाचकांच्या वाचनसवयी – किती वाचतात आणि काय वाचतात – ह्याचा प्राथमिक अभ्यास करणे हा या सर्व्हेचा उद्देश होता.
हे सर्वेक्षण ज्याला convenient sampling किंवा snowball sampling म्हणतात तसं होतं, ज्यांत अगोदर सर्वेक्षण फॉर्म भरलेल्यांकडून पुढे
काहीजणांकडे असे प्रतिसाद आले. वैज्ञानिक अभ्यासाच्या दृष्टीने ही पद्धत सदोष आहे,
कारण ज्या लोकांचा अभ्यास करायचा त्यांचं नीट प्रतिबिंब ह्या डेटामध्ये नाही. आणि
अशा पद्धतीचे निष्कर्ष वैज्ञानिक नसल्याने मानूच नयेत असंही मत असू शकतं. पण
स्मार्टफोन वापरू शकणाऱ्या मराठी वाचकांचे sample अशा अर्थाने विचार केला तर कदाचित हा
सर्वेक्षण तितका सदोष नाही. असो, अपूर्ण माहिती ही शून्य माहितीपेक्षा
चांगली असं मानून मी, सर्वेक्षण करणाऱ्यांच्या वतीने, ह्या माहितीचं
सांख्यिकीय विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रस्तुत लेखात ‘एखादा मनुष्य किती वेळ वाचतो हे त्या व्यक्तीच्या attributes कशाप्रकारे
अवलंबून असते?’ ह्या प्रश्नाची चर्चा सर्वेक्षणातील माहिती
वापरून केलेली आहे. सर्वेक्षणाच्या सुरुवातीलाच ‘काय ते एवढे % लोक असं करतात आणि
तेवढे % तसं हे सांगायचं डेटा वापरून’ अशी एक अत्यंत प्रेरक प्रतिक्रिया
मिळाल्याने मी exploratory analysis किंवा basic tabulation म्हणतात त्यावर फार वेळ घालवत नाही. Table 1 मध्ये डेटामध्ये
लिंग, शिक्षण, रहिवास इत्यादी प्रमुख घटकांचे कसे प्रतिबिंब
आहे हे कळू शकते.
Table
1
एकूण sample
संख्या:- ८५२४ |
||
|
Attribute |
% |
|
पुरुष
|
५६.७%
|
वयोगट
|
वयोगट
०-१० |
०.० |
वयोगट
११-१८ |
१.५ |
|
वयोगट
१९-३० |
१६.७ |
|
वयोगट
३१-५० |
४५.५ |
|
वयोगट
५१-७५ |
३५ |
|
वयोगट
७५+ |
१.२
|
|
शिक्षण
|
शालेय
शिक्षण नाही पण वाचता येते |
०.१
|
सातवी
|
०.२
|
|
दहावी
|
२.८
|
|
बारावी
|
५.८
|
|
पदवी
|
४३.६
|
|
पदव्युत्तर
किंवा त्याहून अधिक |
४७.६
|
|
वैवाहिक
स्थिती |
अविवाहित
|
१८.९ |
सध्या
विवाहित |
७७.६ |
|
जिल्हा/भौगोलिक
स्थान |
मुंबई
महानगरपालिका |
२२.२
|
ठाणे
|
१४.२
|
|
पुणे
|
२७.१
|
|
भारतात
पण महाराष्ट्राबाहेर |
४.१
|
|
भारताबाहेर
|
३.९ |
|
शहरीकरण
|
ग्रामीण
|
७.५
|
निमशहरी
|
१०
|
|
शहरी
|
८२.५
|
|
उपजीविका
|
शेती
|
१.१ |
व्यवसाय
|
८.३
|
|
विद्यार्थी
|
७.२
|
|
उपजीविकेच्या
शोधात |
३.२
|
|
घरकाम
|
६.७
|
|
निवृत्त
|
१५.२
|
|
नोकरी
(अध्यापन-लिखाण-संशोधन वगळून) |
३४.३
|
|
अध्यापन-लिखाण-संशोधन |
१०.९ |
|
अन्य
उपजीविका |
१३.२
|
|
दैनंदिन
वाचनाचा वेळ |
दैनंदिन
वाचन नाही |
२.०
|
अर्ध्या
तासाहून कमी |
१६.२
|
|
अर्धा
तास ते दोन तास |
६२.१
|
|
दोन
तासाहून अधिक |
१९.७
|
हे स्पष्ट आहे कि सर्वेक्षणातून मिळालेला डेटा हा भौगोलिकदृष्ट्या आणि
वाचकांच्या पार्श्वभूमीच्या दृष्टीनेही तेवढा प्रातिनिधिक नाही. फेसबुकसारख्या
समाजमाध्यमावर active असणाऱ्या
(त्यामुळे डिजिटल जगाशी परिचित असणाऱ्या) मराठी वाचक गटाचे हे सर्वेक्षण आहे असेच
मानावे लागेल. सर्वेक्षणातील निष्कर्ष समजून घेताना ही बाब ध्यानात ठेवायला हवी.
मी जे सांख्यिकीय तंत्र वापरले आहे त्याला Ordered probit असं म्हणतात. मी त्याच्या तपशीलात शिरणार नाही. (कोणाला
हे तपशील हवे असल्यास मी ते शेअर करेन.) मी
पुढे (Table 2) जे निष्कर्ष मांडणार आहे ते कसे
समजून घ्यायचे ह्याबद्दल काही गोष्टी लक्षात घेऊया. हे निष्कर्ष शक्यता/संभाव्यता दर्शवणारे
आहेत. ही शक्यता सापेक्ष आहे. आपण Table 2 कडे लक्ष देऊ. त्यांत ‘न वाचणारे’ ह्या कॉलममध्ये
‘वयोगट ५१-७५’ समोर ‘कमी’ असं लिहिलेलं आहे. ह्याचा अर्थ असा: समजा आपण दोन व्यक्ती निवडल्या, ज्या तशातर
एकसारख्या (शिक्षण, वास्तव्य, उपजीविका अशा गोष्टींत) आहेत, पण त्यातील एक
३१-५० वयोगटात आहे आणि दुसरी ५१-७५ वयोगटात, तर ५१-७५ वयोगटातील व्यक्ती दैनंदिन
वाचन न करणारी असण्याची शक्यता ३१-५० वयोगटातील व्यक्ती दैनंदिन वाचन न करणारी
असण्याच्या शक्यतेहून कमी आहे. आपली ही सांख्यिकीय निकालांचा अर्थ लावायची जी
पद्धत आहे ती विज्ञानात ज्याला ceteris paribus म्हणतात त्याचाच
अविष्कार आहे.
Table
2: दैनंदिन
वाचन कालावधी आणि त्यावरील घटकांचे परिणाम
घटक |
न वाचणारे |
अर्ध्या तासाहून कमी वाचणारे |
अर्धा ते दोन तासाहून कमी वाचणारे |
दोन तासाहून अधिक वाचणारे |
स्त्री |
- |
|
|
|
वयोगट ०-१० |
- |
|
|
कमी |
वयोगट ११-१८ |
- |
|
|
|
वयोगट १९-३० |
- |
|
|
|
वयोगट ५१-७५ |
कमी |
कमी |
कमी |
जास्त |
वयोगट ७५+ |
कमी |
कमी |
कमी |
जास्त |
शालेय शिक्षण नाही पण वाचता येते |
|
जास्त |
|
कमी |
सातवी |
|
|
|
कमी |
दहावी |
|
जास्त |
|
कमी |
बारावी |
|
|
|
|
पदव्युत्तर किंवा त्याहून अधिक |
कमी |
कमी |
कमी |
जास्त |
अविवाहित |
|
|
|
|
विवाहित पण सध्या एकटे |
|
|
|
|
मुंबई महानगरपालिका |
|
|
|
|
ठाणे |
|
|
|
|
रायगड |
कमी |
कमी |
|
जास्त |
पालघर |
|
|
|
|
अन्य कोकण |
कमी |
|
|
|
नाशिक |
कमी |
कमी |
|
|
खानदेश (नाशिक शिवाय) |
कमी |
|
|
|
मराठवाडा |
कमी |
कमी |
कमी |
जास्त |
नागपूर |
|
|
|
|
नागपूर विभागातील अन्य जिल्हे |
कमी |
कमी |
|
जास्त |
अमरावती विभाग |
कमी |
कमी |
कमी |
जास्त |
देश (पुणे शिवाय) |
कमी |
कमी |
कमी |
जास्त |
भारतात पण महाराष्ट्राबाहेर |
|
|
|
|
भारताबाहेर |
|
जास्त |
|
कमी |
ग्रामीण |
कमी |
कमी |
|
जास्त |
निम-शहरी |
|
|
|
|
शेती |
|
|
|
|
शेती आणि शिक्षण-लेखन-संशोधनाशिवाय अन्य व्यवसाय |
|
|
|
|
निवृत्त |
कमी |
कमी |
कमी |
जास्त |
विद्यार्थी |
कमी |
कमी |
कमी |
जास्त |
शिक्षण-लेखन-संशोधन |
कमी |
कमी |
कमी |
जास्त |
घरकाम |
कमी |
कमी |
कमी |
जास्त |
कामाच्या शोधात |
|
|
|
|
अन्य उपजीविका |
कमी |
कमी |
कमी |
जास्त |
(‘कमी’ किंवा ‘जास्त’ ठरवताना ज्याला p-value म्हणतात
ती विचारात घेतलेली आहे. p-value ही ०.०५ पेक्षा कमी असेल तेव्हाच घटकाचा वाचनाच्या
वेळेच्या संभाव्यतेवर प्रभाव आहे असं पकडून हे निष्कर्ष मांडलेले आहेत.) |
Table 2 वरून आपल्याला काही निष्कर्ष काढता येतात. ते
पाहूया.
1. स्त्री किंवा पुरुष असण्याचा
वाचनासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेच्या शक्यतेवर काही प्रभाव नाही. म्हणजे ह्या
सर्वेक्षणात सहभागी लोक, ज्यांना आपण थोडक्यात स्मार्टफोन वापरू शकणारे
मराठी वाचक म्हणू, ह्यांच्यात
ते स्त्री आहेत का पुरुष ह्याचा वाचनाला किती वेळ द्यायचा ह्यावर काही प्रभाव नाही
असं दिसतंय. हा एक सकारात्मक निष्कर्ष आहे, पण त्याचवेळी तो न-डिजिटल वाचकांना लागू पडेल का
हा कुतूहलाचा विषय आहे. घरकाम, स्वतःच्या वाचनावर पैसा आणि वेळ खर्च करण्याची मुभा
ह्याबाबतीत स्त्री-पुरुष ह्यांच्यातील भेद मिटत आले आहेत असा एक गट आहे आणि हे भेद
अजून आहेत असा एक गट आहे असं मला वाटतं. ह्यातल्या दुसऱ्या गटाबाबत कदाचित ह्या
सर्वेक्षणात फारशी माहिती नसावी. त्यामुळे हा सकारात्मक निष्कर्ष आपण थोड्या साशंकतेने
साजरा केला पाहिजे.
2. वैवाहिक स्थितीचा दैनंदिन
वाचनाच्या वेळेच्या संभाव्यतेवर वेगळा परिणाम दिसत नाही. व्यक्तीचे प्राधान्यक्रम हे
वैवाहिक स्थितीने बदलतात आणि त्यात वाचनासाठी काढलेला वेळ असू शकतो असं मानलं तर वैवाहिक
स्थितीचा परिणाम नसणं ह्याचा अर्थ असा असू शकतो कि मुळात अविवाहित व्यक्तीत
वाचनाचे प्रणाम जास्त नसावे. शिक्षण, उपजीविकेवर जाणारा वेळ, अन्य मनोरंजन माध्यमे ह्या
सगळ्यांचा हा परिणाम असू शकतो. निष्कर्षांतील ही पहिली धोक्याची घंटा.
3. ५१-७५ आणि त्याहून अधिक
वयाच्या व्यक्ती ह्या वाचनासाठी जास्त वेळ देतात. डिजिटल माध्यमे वापरू शकणाऱ्या
निवृत्त व्यक्ती वाचनासाठी जास्त वेळ देऊ शकतात ह्यात फारसे नवल नाही. ह्या
वयोगटात डिजिटल माध्यमे वापरता येणं हाच मुळात एक सकारात्मक भाग मानला पाहिजे. पण
११-१८, १९-३० ह्या वयोगटातील दैनंदिन वाचनकालावधी हा ३१-५० वयोगटासारखा असणं हे थोडं विचारात
पाडणारं आहे. वर विवाहाच्या मुद्द्यात जी चर्चा झाली, शिक्षण, उपजीविका आणि अन्य मनोरंजन
माध्यमे, ती इथेही लागू पडते.
4. शिक्षणाचा दिसणारा संबंध अपेक्षित
असा आहे. जास्त दैनंदिन वाचनवेळ असणाऱ्या गटात (चौथा स्तंभ) पदव्युत्तर किंवा अधिक
शिक्षण असेल तर जास्त दैनंदिन वाचनकालावधी असण्याची शक्यता वाढते आहे आणि केवळ
शालेय शिक्षण असेल तर जास्त दैनंदिन वाचनकालावधी असण्याची शक्यता कमी होते. हा
निष्कर्ष शिक्षण आणि वाचन ह्यांच्याबद्दल आपल्या मनात जो पूर्वग्रह असतो
त्याच्याशी जुळणारी आहे. इथे हे लक्षात घ्यायला हवं कि आपल्याला परस्परसंबंध (correlation) दिसत आहे, कार्यकारणभाव (causation) नव्हे. अधिक वाचनाची आवड हा अधिक शिक्षण
असण्यासाठी कारणीभूत घटकांपैकी एक असू शकतो. [i]
5. वस्तीस्थानाचा दैनंदिन
वाचनकालावधीशी असलेला संबंध हाही अपेक्षित असाच आहे. अधिक धकाधकी असलेल्या शहरांतील
वाचकांत फरक नाही असे चित्र आहे. जिथे ही धकाधकी कमी आहे अशा शहरी भागांत आणि ग्रामीण
भागात दैनंदिन वाचनकालावधी जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. ग्रामीण भागाच्या
संबंधाबाबत असं म्हणता येईल कि जर पुस्तकांची उपलब्धता आणि क्रयशक्ती हे घटक
अनुकूल असतील (जे सर्वेक्षणात विचारात घेतलेले नाहीत[ii]) तर वाचनकालावधी
जास्त असण्याची शक्यता जास्त होते असे असू शकेल.
6. उपजीविकांच्या बाबतीतही नोकरी
करणारी व्यक्ती ही अधिक व्यस्त असते ह्या पूर्वग्रहाशी जुळणारे निकाल आहेत. निवृत्त
व्यक्ती,
विद्यार्थी, अध्यापन-संशोधन-लिखाण
करणाऱ्या व्यक्ती ह्यांचा दैनंदिन वाचनकालावधी जास्त असण्याची शक्यता नोकरदार
व्यक्तीहून (जी अध्यापन-संशोधन-शिक्षण ह्यातील नोकरी करत नाही) जास्त आहे. इथे विद्यार्थी ह्या गटाच्या संबंधाचा
विचार ‘वय’ ह्या
घटकासोबत केला तर असं दिसतं कि १९-३० वयोगटातील व्यक्ती विद्यार्थी अवस्थेतून
अध्यापन-संशोधन-लिखाण ह्यांच्याशी संबंध नसलेल्या नोकरीत जाते तसा तिचा दैनंदिन
वाचनकालावधी घटण्याची शक्यता वाढते.
7. सांख्यिकीय मॉडेलची स्पष्टीकरण
क्षमता मर्यादित आहे. क्रयशक्ती, दैनंदिन जीवनातील वेळेचा वापर, वाचनवारसा अशा
अनेक महत्वाच्या घटकांवर सर्वेक्षणात
माहिती विचारली गेली नाही. [iii]
ह्या सगळ्या निष्कर्षांचा एकत्र विचार आणि सर्वेक्षणाच्या मर्यादा (एका
ठराविक प्रकारचे वाचक आणि वरील मुद्दा 7) लक्षात घेता असं दिसतं कि डिजिटल
समाजमाध्यमांवर असणाऱ्या मराठी वाचकांच्या वाचनकालावधीत स्त्री-पुरुष असा भेद दिसत
नाही,
विद्यार्थी अधिक वाचणारे आहेत ह्या आश्वस्त करणाऱ्या बाबी आहेत, पण महानगरांची आणि
अध्यापन-संशोधन-लिखाण ह्या व्यतिरिक्त नोकऱ्यांची वाढलेली धकाधकी वाचनकालावधी कमी
करते ही चिंतेत टाकणारी बाब आहे. ह्या दोन घटकांचा संबंध भौतिक समृद्धीशी आहे. येत्या
काही वर्षांत अधिकाधिक तरुण व्यक्ती ह्या अशाच धकाधकीचा भाग होणार आहेत आणि ह्या
अभ्यासात दिसणारे निष्कर्ष बरोबर असतील तर अशा व्यक्तींचा दैनदिन वाचनकालावधी घटेल
अशी शक्यता आहे. साहजिक साहित्याच्या डिमांडवर ह्याचा परिणाम
होणार आहे. अर्थात हा नक्त परिणाम दोन घटक परिणामांचा असणार आहे: विद्यार्थी गटाचे
वाचन (जास्त) आणि नोकरदार (कमी). जर विद्यार्थी गटाचे परिणाम हा अधिक प्रभावी असेल
तर नक्त परिणाम वाढता असू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनसवयी हा महत्वाचा
घटक ठरतो. वाचनव्यवहार वाढता राहणे ज्यांना हवे आहे त्यांनी catch them young कडे
लक्ष द्यायला हवे. लोकांचा वाचनकालावधी हा
विद्यार्थीदशेतून नोकरी-व्यवसायात जाताना घटतो आणि जसे ते निवृत्तीकडे येतात तसा
वाढतो, शेवटी
त्यांना मिळू शकणाऱ्या निवांत बौद्धिक स्पेसचा हा मामला असावा. पण शहरांची धकाधकी
ही मधल्या टप्प्यातील वाचन फारच घटवू शकते आणि निवृत्त/निवांत जगण्याचे वयही
लांबवते. येत्या काळांत, ज्यांत समाजात ३१-५० वयोगटाचे प्रमाण वाढणार आहे
आणि शहरीकरणही, त्यांत सुरुवातीला मराठी वाचनाची मागणी घटण्याचा कल दिसू शकतो, जो
पुढे जाऊन बदलून वाढीकडे येऊ शकतो, जसे समाजातील ५० च्या पुढच्या वयांचे प्रमाण
वाढेल. नवे वाचक बनणं आणि वाचणाऱ्या माणसाची वाचनाची खुमखुमी आयुष्याच्या मधल्या
टप्प्यात टिकून राहणं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतील.
समारोप
हा सर्वेक्षण मराठी वाचकांतील एका मर्यादित आणि कदाचित भौतिकदृष्ट्या
संपन्न किंवा अधिक जागरूक गटाचा सर्वेक्षण
आहे. ह्या सर्वेक्षणाची डेटा मिळवायची पद्धत ही सर्वोत्तम नाही. ह्या मर्यादा
लक्षात घेता सर्व्हेतील निष्कर्ष हे अधिक अभ्यासाची गरज अधोरेखित करण्यासाठी आहेत
आणि कोणताही अंतिम धोरणात्मक निष्कर्ष ठरवायला नाही. मराठी भाषेबद्दलच्या
समाजशास्त्रीय संशोधनात अधिक संख्यात्मक (quantitative) तंत्रांचा वापर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हा सर्वेक्षण
डेटा उपलब्ध आहे. मराठीतील लेखन-वाचन व्यवहार समृद्ध होण्याच्या प्रक्रियेत हा
अभ्यास कारणी लागावा हीच आमची अपेक्षा आहे.
अधिक अभ्यासाच्या काही स्वाभाविक दिशा असू शकतात. एखाद्या शहरातील व्यक्तींचा
अधिक शास्त्रीय sampling द्वारे त्यांच्या वाचनसवयींबाबत सर्व्हे करणं, अधिक
वाचणाऱ्या लोकांच्या वाचनसवयी कशा प्रत्यक्षात आल्या ह्यासाठी काही मुलाखती घेणं,
विद्यार्थ्यांच्या वाचनसवयींबाबत होणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेणं अशी काही
उदाहरणे देता येतील. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील भाषाविषयक प्रश्नांत रुची
असलेल्या संशोधकांनी, त्यांना उपलब्ध संशोधन रिसोर्सेस ह्या प्रश्नाकडे वळवले तर असे अनेक
अभ्यास प्रत्यक्षात येऊ शकतात. ह्या संशोधनाला मराठीच्या संदर्भातच मूल्य आहे असे
नाही. विश्वरूपाकार इंग्रजीसमोर राजकीय आणि आर्थिक सामर्थ्यात तोकड्या साऱ्याच
भाषांसाठी असे प्रश्न महत्वाचे राहणार आहेत.
(सर्वेक्षण माहितीत किती वाचतात सोबत काय वाचतात ह्याचाही धांडोळा
घेण्याचा प्रयत्न केला होता. पुढच्या लेखात ह्या बाजूबद्दल लिहिले जाईल.)
[i] सांख्यिकी अभ्यासकांना इथे endogeneity चा मुद्दा लक्षात येऊ शकतो. त्या मुद्द्याकडे मी दुर्लक्ष केलेलं
नाही. पण हे लिखाण समजसुलभ रहावे म्हणून मी सांख्यिकी ही परस्परसंबंध दाखवायला
वापरली आहे आणि कार्यकारणभावाचा दावा टाळलेला आहे. असे केल्याने मी endogeneity ला बगल देऊन सांख्यिकीय तंत्रे वापरण्याचे धाडस केलेले आहे.
[ii] सांख्यिकी अभ्यासकांना इथे omitted variables चा मुद्दा लक्षात येऊ शकतो. आधी म्हटलं तसं आदर्श
स्पष्टीकरण शक्य नसताना सदोष स्पष्टीकरण करावे का नाही ह्या मूलभूत प्रश्नात मी
करावे असा मार्ग निवडलेला आहे. ह्या मर्यादेमुळे हे स्पष्टीकरण अधिक अभ्यासाची
जाणीव निर्माण करायला आहे आणि धोरणनिर्णय घ्यायला नाही.
[iii] डिजिटल सर्वेक्षणात, ज्यांत व्यक्ती स्वतःहून
सहभागी होतात,
विचारलेल्या प्रश्नांची संख्या आणि काठीण्य ह्यांचा आणि सर्वेक्षणाला मिळणाऱ्या
प्रतिसादांचा व्यस्त संबंध असतो. सर्वेक्षण नियोजन करताना त्याला भरघोस प्रतिसाद
(८५००!) मिळेल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे मर्यादित आणि पटकन असे सर्वेक्षण
बनवले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा