पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रुपयाचे अवमूल्यन आणि सरकार – काही निरीक्षणे

इमेज
  आपल्या सगळ्यांसारखाच जे काही चाललंय – म्हणजे रुपयाचे अवमूल्यन , इंधन किंमती वाढणे किंवा वाढायची शक्यता , महागाई आणि त्याबाबत सरकारची धोरणे ह्याचा विचार मी करतो. मला त्यात पेच हा होता कि सरकारकडे ह्या प्रश्नाबाबत पुरेशी माहिती आहे, कदाचित अशीही माहिती आहे जी बाकी सगळ्यांना उपलब्ध नाही, पण तरीही अनेक तज्ज्ञ सरकारला देत असलेला सल्ला – रुपयाच्या किंमतीत हस्तक्षेप करू नका , पडू द्या , त्याचे परिणाम जे व्हायचे ते होऊ द्या – आणि प्रत्यक्षातले सरकारचे निर्णय ह्यांत तफावत का आहे. मग माझ्या लक्षात आलं कि फरक दृष्टीच्या पल्ल्याचा आणि उद्दिष्टांचा आहे. त्यातून मी माझी काही निरीक्षणे मांडत आहे. हा सरकारच्या धोरणांचा बचाव नाही. रुपयाची किंमत आणि इंधनाची किंमत ही सरकारी हस्ताक्षेपावाचून ठरावी आणि त्यातून जी होईल ती पिडा आपण सहन करावी ह्या भूमिकेला माझी सहानुभूती आहे. पण ही भूमिका आपण ज्या सामाजिक-राजकीय अवस्थेत आहोत त्याच्याशी विसंगत आहे. मायबाप सरकार ते स्पर्धात्मक बाजारपेठेपासून अलिप्त सरकार हा प्रवास आपण नुकताच सुरु केलेला आहे आणि त्यातही निवडणुका आल्या कि आपण मायबाप टोकाकडे जातच असतो....

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

इमेज
 लोकसत्तात काहीसा संक्षिप्त लेख प्रकाशित झाला आहे. ( दुवा ) मूळचा लेख इथे देत आहे.  ‘ट्रॉली प्रॉब्लेम’ हा नैतिकशास्त्रातले एक उदाहरण किंवा संकल्पना आहे. तुमच्याकडे तर एक कृती करण्याची किंवा न करण्याची निवड आहे. केली तर ५ व्यक्ती वाचणार आणि १ मरणार आणि नाही केली तर १ वाचणार आणि ५ मरणार. तर तुम्ही कृती करणार का नाही हा तो ट्रॉली प्रॉब्लेम. हा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर अशी बरीच शक्यता आहे कि तुम्ही कृती करण्याची निवड केली असेल. कारण १ व्यक्ती मरणे हे ५ व्यक्ती मरण्यापेक्षा बरे. ट्रॉली प्रॉब्लेमच्या अनुषंगाने आपल्याला मानवी वर्तनातील एक महत्वाची विसंगती दिसते. आपण आपल्या मनात आपल्या कुटुंबाच्या बाहेरील लोकांचे मूल्यमापन करताना संख्येने प्रभावित होत असतो. जितके जास्त लोकांचे नुकसान तितके ते अधिक लक्षवेधक ठरते. २५ जण मृत्युमुखी पडलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ही विसंगती आणि आपल्या काळाचा व्यवच्छेदक असा वेगविकार दिसून आलेला आहे.  अपघातातील बळींचा आकडा मोठा आहे ह्यामुळे त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियाही जास्त आहेत. पण असं म्हटलं तर असं म्हणणाऱ्यालाच लोक अपघाताचे...