पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

व्हायलंट डिलाईटसच्या व्हायलंट एंडच्या आधी – १

इमेज
 प्रामुख्याने   पंजाब-हरयाणा (म्हणजे MSP) शेतकऱ्यांचे आंदोलन हे स्टेलमेटवर येऊन पोचलेले आहे. कायदे मागे घेणार नाही हे सरकारने स्पष्ट केलेले आहे. न्यायालयाने सुचवलेला समितीमार्ग हा मुळातच नेमस्त लोकांचा आहे आणि तो जो तडजोडबिंदू सुचवेल तो सरकारी भूमिकेलाच जवळ असेल असं आता वाटतं आहे. शेतकरी संघटना ह्याही कायदे रद्द करा ह्या मागणीला चिकटून आहेत. ह्या आंदोलनाबद्दल, म्हणजे त्याच्या पाठच्या शेती कायद्यांबद्दल आणि त्यातून येऊ शकणाऱ्या- न शकणाऱ्या बदलांबद्दल मला जे कळलं ते मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. क्रमशः काही ब्लॉगपोस्टमधून ते मी मांडणार आहे.  प्रतिमासौजन्य: Indian Express  -- नव्या शेती कायद्यांत ऑन द फेस व्हॅल्यू विरोध करावं असं काही नाही. शेतीमालाची उत्पादन किंमत आणि ग्राहकाला मोजावी लागणारी किंमत ह्यांत तफावत आहे. साठवणूक , वाहतूक आणि किरकोळ विक्री ह्यांच्या खर्चाच्याहून ही तफावत जास्त आहे. समाजाचे आर्थिक हित हे उत्पादन किंमत आणि बाजारभाव ह्यांच्या फरकाशी व्यस्त प्रमाणात असते. त्यामुळे हा फरक , तफावत कमी होणार असेल तर ते समाजाच्या आर्थिक हिताचेच आहे. शेती कायदे तत्वतः शेतीमाल

विनय सीतापती ह्यांचे ‘जुगलबंदी’

इमेज
मी ह्या अगोदरचे विनय सीतापती ह्यांचे पी.व्ही. नरसिंहराव ह्यांचे चरित्र  ‘हाफ लायन ’ वाचले होते आणि ते मला आवडले होते. हे चरित्र भक्तिभावाने नाही तर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले होते, पण तरीही ते ओघवते होते. पी.व्ही. नरसिंहराव ह्यांना इतिहासात पुनर्वसित करण्याचा प्रयत्नात ह्या पुस्तकाचा मोठा वाटा असणार आहे. अमित वर्मा ह्यांची ‘ the seen and the unseen’ podcast आहे त्यात एका भागात सीतापती आले होते. ह्या podcast चा सुरुवातीचा भाग ऐकून मी पुस्तक वाचायचं ठरवलं. (पुस्तक न वाचताच पुस्तकाचं सार समजून घ्यायचं असेल तर podcast ऐका.) प्रतिमासौजन्य - Penguin Random house  जुगलबंदी हे अत्यंत ओघवतं , अगदी unputdownable म्हणता येईल असं पुस्तक आहे. वाजपेयी आणि अडवाणी ह्या जोडगोळीचा राजकीय उदयास्त ही पुस्तकाची थीम आहे. पण थीम हिंदुत्ववादी राजकारणाच्या चिकित्सेचे निमित्त आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. पण पुस्तकात लेखकाने narrative आणि analysis ह्यांना वेगळं ठेवलेलं आहे. मुख्य प्रकरणे जनसंघाची स्थापना ते २००४ सालचा NDA चा पराभव ह्या कालवधीत वाजपेयी-अडवाणी ह्यांची राजकीय कारकीर्द कशी होती हे सांगतात.

डिजिटल मराठी वाचकांचे दैनंदिन वाचन

  ‘ सजग चॅरिटेबल ट्रस्ट’ ह्या संस्थेच्या वतीने (जिचा मी संस्थापक सदस्य आहे) आणि मराठीतील वाचनव्यवहाराच्या एक कार्यशील संशोधिका मेघना भुस्कुटे ह्यांच्या मदतीने वाचनसवयींचेएक सर्वेक्षण ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये केले गेले. हे सर्वेक्षण गुगल फॉर्म्सद्वारे केले गेले आणि समाजमाध्यमांतून ते लोकांपर्यंत पोचले. सुमारे ८५०० प्रतिसाद ह्या सर्व्हेला मिळाले. मराठी वाचकांच्या वाचनसवयी – किती वाचतात आणि काय वाचतात – ह्याचा प्राथमिक अभ्यास करणे हा या सर्व्हेचा उद्देश होता. हे सर्वेक्षण ज्याला convenient sampling किंवा snowball sampling म्हणतात तसं होतं, ज्यांत अगोदर सर्वेक्षण फॉर्म भरलेल्यांकडून पुढे काहीजणांकडे असे प्रतिसाद आले. वैज्ञानिक अभ्यासाच्या दृष्टीने ही पद्धत सदोष आहे, कारण ज्या लोकांचा अभ्यास करायचा त्यांचं नीट प्रतिबिंब ह्या डेटामध्ये नाही. आणि अशा पद्धतीचे निष्कर्ष वैज्ञानिक नसल्याने मानूच नयेत असंही मत असू शकतं. पण स्मार्टफोन वापरू शकणाऱ्या मराठी वाचकांचे sample अशा अर्थाने विचार केला तर कदाचित हा सर्वेक्षण तितका सदोष नाही. असो , अपूर्ण माहिती ही शून्य माहितीपेक्षा चांगली असं