पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

नवे शैक्षणिक धोरण २०२० आणि इंग्रजीतून शिक्षण

नवे शैक्षणिक धोरण २०२० अर्थात NEP 2020 हा सध्या चर्चेचा विषय आहे. हे गेमचेंजर धोरण आहे अशा स्वरुपाची स्तुती ह्या धोरणाबाबत होते आहे. (मला ह्या धोरणाची PDF पण जरा शोधायला लागली. कोणाला हवी असेल तर इथे आहे. )      शिक्षणाच्या अनेक पैलूंवर ह्या नव्या योजनेत काही ना काही निर्णय आहेत. त्यातल्या शिक्षणाची भाषा (Medium or language of instruction) बद्दल काही त्रोटक निरीक्षणे मी इथे नोंदवणार आहे. प्रामुख्याने Twitter वर इंग्रजी-प्रादेशिक भाषा ह्यांच्याबद्दलच्या चर्चेची राळ उडाली होती. आणि नेहमी असतं तसं मुळात काय म्हटलं आहे ह्याबाबत नीट माहिती न देता बहुतेक लोक आपले निष्कर्ष देत होते.  पॉलिसि ड्राफ्टमधले वाक्य (पान १२ वर) Wherever possible, the medium of instruction until at least Grade 5, but preferably till Grade 8 and beyond, will be the home language/mother-tongue/local language. असे आहे. Wherever possible वापरून इथे सरकारने हे स्पष्ट केलं आहे कि सक्ती नाही. म्हणजेच सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून शिक्षण घेण्यावर सरकारने कोणताही बदल केलेला नाही. Wherever possible मध्ये possible ठर

लॉकडाऊन से क्या होता है?: कल्याण-डोंबिवलीच्या लॉकडाऊनचा प्रयोग आणि पुढे काय?

इमेज
मी ह्या आधी लिहिलं होतं कि लॉकडाऊनचा प्रभाव कळायला साधारण १० दिवस जाऊ द्यायला हवेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये २ जुलै २०२० ते १९ जुलै २०२० असे १८ दिवस लॉकडाऊन होतं. म्हणजेच १२ जुलै २०२० ते २९ जुलै २०२० ह्या कालावधीतील आकडेवारीत लॉकडाऊनचा काय फरक असेल तो दिसायला हवा. सोबतच्या आकृती-१ मध्ये हे स्पष्ट दिसेल कि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊनच्या काळात केसेसचा ट्रेंड कोसळायला सुरुवात झालेली आहे. 7-day moving average नावाचा प्रकार ट्रेंड बघायला वापरला जातो. (केशरी रंगाची वक्ररेषा) तो पाहता केसेस घटण्याचा ट्रेंड स्पष्ट आहे. आणि त्यात हेही दिसेल कि साधारण १२ जूनपासून, म्हणजे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून १० दिवसांनी आपल्याला हा ट्रेंड खाली वळलेला दिसतो.  आकृती-१  लॉकडाऊन नसतं तर काय झालं असतं ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर द्यायचा ठीकठाक प्रयत्न आता करता येऊ शकतो. आधीच्या लेखात स्पष्ट केलेलं त्या forecasting तंत्राने पाहिलं तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १२ जुलै ते २९ जुलै ह्या काळात लॉकडाऊन नसते तर मध्यवर्ती अंदाजानुसार (आकृती-२ मधील निळी रेषा) १२२७७ केसेस दिसायला हव्या होत्या. प्र

लॉकडाऊनसे क्या होता है? - कल्याण-डोंबिवलीचे उदाहरण

इमेज
कल्याण-डोंबिवलीत २ जुलैपासून सुरू असलेले लॉकडाऊन १९ जुलैला संपणार आहे. ह्याआधी ते १२ जुलैला संपणार होते. पण ११ जुलैला ते अजून सात दिवस वाढवले गेले. ११ आणि १२ जुलैला अनुक्रमे ६१५ आणि ६६१ केसेस आल्याने हा निर्णय योग्यच वाटला. त्यानंतर २ दिवस , सोमवार १३ जुलै , मंगळवार १४ जुलै , केसेस पडत्या होत्या , अनुक्रमे ४२७ आणि ३३६. मग मग २ दिवस त्या परत वाढत आहेत.   शुक्रवार-शनिवारी महानगरपालिका लॉकडाऊन वाढवायचा कि नाही हा निर्णय घेईल. निर्णय हे पुराव्यांवर आधारित असावेत , भावनांवर नाही. कोव्हीड-१९ च्या बाबतीत पुरावे म्हणजे आकडेवारी. पण आकडेवारी ही केवळ आहे तशी बघून चालत नाही. उदाहरणार्थ- २ जुलैच्या लॉकडाऊनचा फरक पहायचा असेल तर कोणत्या तारखेपासून पाहावा ? आता २ जुलैला एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाव्हायरसने शिरकाव केला तर ८ जुलैला आपण टेस्ट करून घ्यावी अशी लक्षणे दिसायची शक्यता आहे. मग टेस्ट करायची तयारी आणि त्याचा positive निकाल मिळायला पुढचे काही दिवस . म्हणजे साधारण १० दिवसांनंतर अशा व्यक्तीच्या शरीरा