पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रुपयाचे अवमूल्यन आणि सरकार – काही निरीक्षणे

इमेज
  आपल्या सगळ्यांसारखाच जे काही चाललंय – म्हणजे रुपयाचे अवमूल्यन , इंधन किंमती वाढणे किंवा वाढायची शक्यता , महागाई आणि त्याबाबत सरकारची धोरणे ह्याचा विचार मी करतो. मला त्यात पेच हा होता कि सरकारकडे ह्या प्रश्नाबाबत पुरेशी माहिती आहे, कदाचित अशीही माहिती आहे जी बाकी सगळ्यांना उपलब्ध नाही, पण तरीही अनेक तज्ज्ञ सरकारला देत असलेला सल्ला – रुपयाच्या किंमतीत हस्तक्षेप करू नका , पडू द्या , त्याचे परिणाम जे व्हायचे ते होऊ द्या – आणि प्रत्यक्षातले सरकारचे निर्णय ह्यांत तफावत का आहे. मग माझ्या लक्षात आलं कि फरक दृष्टीच्या पल्ल्याचा आणि उद्दिष्टांचा आहे. त्यातून मी माझी काही निरीक्षणे मांडत आहे. हा सरकारच्या धोरणांचा बचाव नाही. रुपयाची किंमत आणि इंधनाची किंमत ही सरकारी हस्ताक्षेपावाचून ठरावी आणि त्यातून जी होईल ती पिडा आपण सहन करावी ह्या भूमिकेला माझी सहानुभूती आहे. पण ही भूमिका आपण ज्या सामाजिक-राजकीय अवस्थेत आहोत त्याच्याशी विसंगत आहे. मायबाप सरकार ते स्पर्धात्मक बाजारपेठेपासून अलिप्त सरकार हा प्रवास आपण नुकताच सुरु केलेला आहे आणि त्यातही निवडणुका आल्या कि आपण मायबाप टोकाकडे जातच असतो....

मुंबई आणि लोकल ट्रेन: लाईफलाईनचे दुष्परिणाम?

इमेज
  १५ ऑगस्ट २०२१ पासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल ट्रेन वापरण्याची मुभा राज्य सरकारने दिली. जवळपास महिनाभर आधीपासूनच लोकल ट्रेन वापरायची मुभा देण्याची मागणी प्रवासी संघटना आणि विरोधी पक्ष करत होते. कोव्हीड-१९ च्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना, पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही लाटांच्या नंतर , लोकल ट्रेन सुविधा सुरु करणं हा मुंबई महानगर प्रदेशासाठी कळीचा मुद्दा बनलेला होता. मुंबई महानगर प्रदेश (मुंबई महानगरपालिका क्षेत्र आणि ठाणे , पालघर , आणि रायगड जिल्ह्यांतील पूर्ण किंवा बराचसा शहरी भाग) आणि लोकल ट्रेन ह्यांचा परस्परसंबंध हा भारतातील अन्य महानगरांच्या सार्वजनिक वाहतूक सेवेशी असणाऱ्या संबंधांहून वेगळा आहे. (सारणी १) मुंबई महानगरक्षेत्र आणि लोकल ट्रेन ह्यांचा परस्परसंबंध आणि त्यातून निर्माण होणारी परिस्थिती ह्याचा आढावा प्रस्तुत लेखात घेतलेला आहे. सारणी १: भारतातील महानगरांची तुलना   महानगर जिल्हा १   निवास ते कार्यालय प्रवासाची सरासरी (कि.मी.) २ ५१ किमीहून अधिक प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण (%) ल...