पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रुपयाचे अवमूल्यन आणि सरकार – काही निरीक्षणे

इमेज
  आपल्या सगळ्यांसारखाच जे काही चाललंय – म्हणजे रुपयाचे अवमूल्यन , इंधन किंमती वाढणे किंवा वाढायची शक्यता , महागाई आणि त्याबाबत सरकारची धोरणे ह्याचा विचार मी करतो. मला त्यात पेच हा होता कि सरकारकडे ह्या प्रश्नाबाबत पुरेशी माहिती आहे, कदाचित अशीही माहिती आहे जी बाकी सगळ्यांना उपलब्ध नाही, पण तरीही अनेक तज्ज्ञ सरकारला देत असलेला सल्ला – रुपयाच्या किंमतीत हस्तक्षेप करू नका , पडू द्या , त्याचे परिणाम जे व्हायचे ते होऊ द्या – आणि प्रत्यक्षातले सरकारचे निर्णय ह्यांत तफावत का आहे. मग माझ्या लक्षात आलं कि फरक दृष्टीच्या पल्ल्याचा आणि उद्दिष्टांचा आहे. त्यातून मी माझी काही निरीक्षणे मांडत आहे. हा सरकारच्या धोरणांचा बचाव नाही. रुपयाची किंमत आणि इंधनाची किंमत ही सरकारी हस्ताक्षेपावाचून ठरावी आणि त्यातून जी होईल ती पिडा आपण सहन करावी ह्या भूमिकेला माझी सहानुभूती आहे. पण ही भूमिका आपण ज्या सामाजिक-राजकीय अवस्थेत आहोत त्याच्याशी विसंगत आहे. मायबाप सरकार ते स्पर्धात्मक बाजारपेठेपासून अलिप्त सरकार हा प्रवास आपण नुकताच सुरु केलेला आहे आणि त्यातही निवडणुका आल्या कि आपण मायबाप टोकाकडे जातच असतो....

विसंगत प्राणीदयेची समस्या

 २६ जून २०२३ च्या लोकसत्ता मध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येबद्दल विश्लेषणात्मक लेख आहे. लेखातला गोंधळात टाकणारा प्रकार म्हणजे भारतात प्रचंड प्रमाणात कुत्र्यांचे अवांछित चावे ही समस्या सुरुवातीला मांडून पुढे हे चावे ही माणसांचीच कशी चूक आहे हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे भटके कुत्रे नव्हे तर राहती माणसे हीच समस्या असा तो लेख होतो. अर्थात प्राणीमित्र नावाच्या प्रजातीचा दृष्टीकोन प्रातिनिधिकदृष्ट्‍या मांडणारा लेख असं पाहिलं तर ही विसंगती नसून गुणधर्म आहे हे लक्षात येतं. (पण हा वोक लेख नाही हा. असा आळ येऊ नये म्हणून सुरुवातीलाच सरमाच्या उल्लेखाची तीट लावलेली आहे.) मुळात भटक्या कुत्र्यांची समस्या नाही. समस्या त्यांच्याबद्दल चुकीचे धोरण असण्याची आहे. भटके कुत्रे रस्त्यावर नसणे हेच सामाजिक धोरणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. त्यामुळे भटक्या कुत्र्‍यांना त्यांच्यासाठी चालवण्यात येणाऱ्या shelters दाखल करणे आणि तिथे स्वयंसेवी संस्थांनी त्यांची काळजी घेणे, shelters मधील पात्र प्राणी हे ज्यांना प्राणी पाळायचे आहेत त्यांनी आपल्या घरी नेणे, आणि जे भटके कुत्रे shelters मध्ये राहू शकत नाहीत अशां...