पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

अपुऱ्या टेस्टिंगने केसेस घटतात का? - नाही!

इमेज
मार्च २०२०, म्हणजे कोव्हीड-१९ महामारीची साथ भारतात दाखल झाल्यापासून 'पुरेश्या टेस्ट्स होत नाहीत' हे विधान आपण अनेकांकडून ऐकलेलं/वाचलेलं आहे. सुरुवातीला हे विधान काहीसे खरेही होते. एखाद्या गोष्टीचा पुरवठा पुरेसा आहे का नाही ह्याचे लक्षण म्हणजे ज्या किमतीला ती गोष्ट (वस्तू/सेवा) विक्रीला आहे आणि त्या किमतीला विकत घेऊ शकणाऱ्या,  ज्या लोकांना ही वस्तू/सेवा विकत घेण्याची कायदेशीर मुभा आहे  त्या,  कोणालाही ती मिळत असेल तर पुरवठा पुरेसा आहे असं म्हणता येतं. कोव्हीड-१९ च्या साथीच्या सुरुवातीच्या काळात टेस्ट्स करू पाहणारे जास्त आणि टेस्ट्सचा पुरवठा कमी अशी अवस्था होती आणि त्यामुळे हा पुरवठा सरकारनेच नियंत्रित केलेला होता.  मार्केटव्यवस्थेत टंचाई हा पुरवठादारांसाठी सिग्नल असतो कि त्यांनी पुरवठा वाढवावा. आपण अनुभवलं आहे कि मास्क, sanitizer ह्यांच्या बाबतीत सुरुवातीला टंचाई होती आणि त्यानंतर पुरेसा पुरवठा बाजारात आला. हेच टेस्टिंगसाठीही झालेलं आहे. मार्च २०२० च्या तुलनेत आज RT-PCR टेस्ट करणे, ती विकत घेऊ शकणाऱ्यासाठी सहज शक्य आहे आणि ह्या महागड्या टेस्टला स्वस्त पण कमी गुणवत्तेचा असा antig

कोव्हीड-१९ पूर्व जगण्याकडे एक एक पाउल आणि डेटामधले धोक्याचे बावटे

इमेज
 ५ ऑक्टोबर २०२० पासून महाराष्ट्रातील रेस्टॉरंट आणि बार्स ह्यांना त्यांचा प्रत्यक्ष (होम-डिलिव्हरी) व्यतिरिक्त व्यवसाय सुरू करायला परवानगी देण्यात आलेली आहे. कोव्हीड-१९ च्या छायेतील हा व्यवसाय कसा करावा ह्याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केलेल्या आहेत. ह्या मार्गदर्शक सूचना ह्या निष्फळ होतील असं मला वैयक्तिक निरीक्षणातून वाटतं. जून-जुलैपासून जी दुकाने सुरू झालेली आहेत त्यांच्यासाठीही अशी मार्दर्शक तत्वे आलेली होती. माझ्या आसपासच्या अशा दुकानांच्या निरीक्षणात मला असं दिसलं आहे कि औषधाची दुकाने सोडली तर बाकी दुकाने ही मास्क आणि काही प्रमाणात hand-sanitizer ह्यापलीकडे काही काळजी घेत नाहीत. लोक एकमेकांपासून काही सेमी अंतरावर, प्रसंगी खेटूनही उभे असतात आणि कित्येक जण मास्कही लावत नाहीत, अनेक जण चुकीच्या पद्धतीने लावतात.  औषधांच्या काही दुकानांत तर प्लास्टिक पडद्याडूनच व्यवहार चालू आहे. त्यांनी ही खबरदारी अर्थातच स्वतःच्या risk-assessment मधून घेतलेली आहे. औषध दुकानात विषाणूबाधित व्यक्ती यायची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळे अशी दुकाने सर्वात जास्त काळजी घेतील हे तसे साहजिक आहे.  रेस्

वर्क फ्रॉम होमचे शेवटचे काही दिवस? - Revealed preferences काय सांगतात

इमेज
  लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा आता आपले कसे जग बदलून जाईल अशा थाटाची अनेक भाकिते केली जात होती. मी स्वतःसुद्धा काही प्रमाणात असे काही आमूलाग्र बदल होतील अशी अपेक्षा करत होतो. पण आता ६ महिन्याच्या कालावधीनंतर असे आमूलाग्र बदल झाले असल्याची काही चिन्हे नाहीत. सेम ओल्ड, सेम ओल्ड अशाच अवस्थेकडे आपण परत चाललो आहोत असं दिसतंय.  ह्या सेम ओल्ड, सेम ओल्डचाच एक भाग म्हणजे वर्क फ्रॉम होम. अनेकजण जे मार्चचा मध्य ते मे किंवा जून ह्या काळांत वर्क फ्रॉम होम करत होते त्यांना आता प्रत्यक्ष कामावर जावे लागत आहे. जानेवारी २०२१ मध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचे प्रमाण जानेवारी २०२० मध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांहून फार जास्त असेल का? अर्थात कोव्हीड-१९ चा मृत्यूदर आणि त्यातील त्रासाचे (रुग्णालय मिळणे, अशक्तपणा) ह्याचे प्रमाण किती वाढते ह्यावर काय होते हे अवलंबून आहे. पण मागच्या सहा महिन्यांचा ट्रेंड पाहता आपण कोव्हीड-१९ पूर्वीच्या अवस्थेकडे झपाट्याने परततो आहोत अशीच सारी चिन्हे आहेत. एकएक करून कोव्हीड-१९ पूर्व काळातील बहुतेक गोष्टी करण्यावर असलेली बंधने कमी होत आहेत. त्यामुळे जानेवारी २०२१ पर्यंत बरीच बंधने सैल