पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रुपयाचे अवमूल्यन आणि सरकार – काही निरीक्षणे

इमेज
  आपल्या सगळ्यांसारखाच जे काही चाललंय – म्हणजे रुपयाचे अवमूल्यन , इंधन किंमती वाढणे किंवा वाढायची शक्यता , महागाई आणि त्याबाबत सरकारची धोरणे ह्याचा विचार मी करतो. मला त्यात पेच हा होता कि सरकारकडे ह्या प्रश्नाबाबत पुरेशी माहिती आहे, कदाचित अशीही माहिती आहे जी बाकी सगळ्यांना उपलब्ध नाही, पण तरीही अनेक तज्ज्ञ सरकारला देत असलेला सल्ला – रुपयाच्या किंमतीत हस्तक्षेप करू नका , पडू द्या , त्याचे परिणाम जे व्हायचे ते होऊ द्या – आणि प्रत्यक्षातले सरकारचे निर्णय ह्यांत तफावत का आहे. मग माझ्या लक्षात आलं कि फरक दृष्टीच्या पल्ल्याचा आणि उद्दिष्टांचा आहे. त्यातून मी माझी काही निरीक्षणे मांडत आहे. हा सरकारच्या धोरणांचा बचाव नाही. रुपयाची किंमत आणि इंधनाची किंमत ही सरकारी हस्ताक्षेपावाचून ठरावी आणि त्यातून जी होईल ती पिडा आपण सहन करावी ह्या भूमिकेला माझी सहानुभूती आहे. पण ही भूमिका आपण ज्या सामाजिक-राजकीय अवस्थेत आहोत त्याच्याशी विसंगत आहे. मायबाप सरकार ते स्पर्धात्मक बाजारपेठेपासून अलिप्त सरकार हा प्रवास आपण नुकताच सुरु केलेला आहे आणि त्यातही निवडणुका आल्या कि आपण मायबाप टोकाकडे जातच असतो....

रस्ता अपघाताने जी.डी.पी. वाढतो – सोपी आणि चुकीची विधाने कशी असतात?

इमेज
       आज फेसबुकवर मला ही पोस्ट वाचायला मिळाली.  ही पोस्ट साधारणपणे वैचारिक भूमिकेतून आपले फेसबुक चालवणाऱ्या आणि मध्ये-मध्ये लेख वगैरे छापून आणणाऱ्या व्यक्तीने टाकली होती. ‘सायकल चालवणे हे अर्थव्यवस्थेला घातक आहे ’ अशा आशयाचे हे विधान त्यांना पटले आहे का नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेले नाही. पण ह्या पोस्टने मला एकूणच लोकांच्या अर्थशास्त्रीय संकल्पनांच्या तोकड्या समजेची जाणीव झाली. आणि इथे लोक म्हणजे वैचारिक भूमिका असणारे लोक अशा अर्थाने मी लोक हा शब्द वापरतो आहे.        आपण ह्यांना वाईट मानतो अशा घटना घडल्याने जी.डी.पी. वाढतो, अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे अशा विद्रूप मोजमापावर आधारित आधुनिक अर्थव्यवस्था ही विनाशकारी होय अशा आशयाची मांडणी मी पहिल्यांदा दिलीप कुलकर्णी ह्यांच्या ‘निसर्गायण ’ ह्या पुस्तकात वाचली. (प्रकरण: नवं नातं , पान ८७, नोव्हेंबर २००५ आवृत्ती). त्यात ते म्हणतात अपघात वाढले कि अनेक गोष्टी , सेवा ह्यांची खरेदी-विक्री होते आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते असे त्यांचे विधान आहे. आणि म्हणून ‘अधिक...

फुटपाथवर आयब्रो: मूलभूत आहे मार्केट

इमेज
     मी मागच्या पोस्टमध्ये म्हटलेलं कि मी व्यसनांच्या बाबतीत पुढची पोस्ट लिहीन. पण आज मला एक विलक्षण दृश्य पाहायला मिळालं ज्यामुळे मी विषय बदललेला आहे. तर ते दृश्य म्हणजे: ४ स्त्री रहिवासी त्यांच्या इमारतीच्या आसपास, त्या बिल्डींग्स किंवा स्थानिक नगरसेवक ह्यांनी ठेवलेल्या बेंचेस आणि जवळच्या कठड्यापाशी होत्या. लांबून मला जे दिसलं त्यानुसार त्यातली एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या मांडीवर डोकं ठेवून पडली होती , तिसरी स्त्री मांडीवर डोके ठेवलेल्या स्त्रीवर झुकलेली होती आणि चौथी ह्या तिघींच्या जवळच आडोसा केल्यासारखी उभी होती.        सुरुवातीला मला वाटलं कि त्या पडलेल्या स्त्रीला चक्कर वगैरे आली आहे. पण काही पावले पुढे जाताच मला दिसलं कि मांडीवर डोके ठेवून पडलेल्या स्त्रीच्या भुवया तिच्यावर झुकलेली स्त्री तासत आहे. मला अशा सौंदर्यप्रक्रियांची जितपत माहिती आहे त्यानुसार ह्या प्रक्रियेला आयब्रो म्हणत असावेत (चू.भू. द्या.घ्या.)        मार्केट बदलत्या अवस्थेला अनुसरून डिमांड-सप्लाय प्रक्रियेत कसे बदल घडवून आणतं आणि डिमां...

डिमांड-सप्लाय तेथे मार्ग: घरकाम उदाहरण

मार्केट हे अत्यंत मूलभूत आहे. लोकांच्या गरजा आणि ते पुरवणं हे माणसे खूप पूर्वीपासून करत आहेत. ह्या गरजांची पूर्ती करण्यासाठी वेगवेगळे मार्ग लोक चोखाळत आली आहेत. ह्यातले काही मार्ग बंद झाले कि काहीकाळ असे मार्केट बंद होते , पण बहुतेकदा पर्यायी मार्ग शोधला जातोच. आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेले उदाहरण म्हणजे १४५२ मध्ये इस्तंबूल ऑटोमन ताब्यात गेल्यावर भारताशी व्यापाराचा खुष्कीचा मार्ग अडचणीत आल्याने युरोपियन व्यापाऱ्यांनी सागरी मार्गांचा अवलंब वाढवला. कोव्हीड-१९ लॉकडाऊनमध्येही वस्तू/सेवा विक्रीचे अनेक प्रस्थापित मार्ग अडचणीत आले. पण त्यावर लोकांनी तोडगे काढलेच. त्यातले एक उदाहरण म्हणजे घरगुती सेवा जसे , धुणे , भांडी , पाल्यांची काळजी, वृद्धांची/रोग्यांची काळजी, पुरवणाऱ्या व्यक्ती. कोरोनाने व्यक्ती-व्यक्तीमधल्या संपर्कालाच मोठा धोका बनवले. अशावेळी विश्वासू संबंध म्हणजे कुटुंबीय सोडून बाकी सर्वांसोबत भौतिक अंतर राखण्याचा पर्याय आपल्याला निवडायला लागला. साहजिक आहे कि ह्या उघड विश्वासाच्या वर्तुळाबाहेरील व्यक्तींना आपण लॉकडाऊनमध्ये आपल्या संपर्कात येण्यापासून थांबवलं. कितीही जवळची अ...