पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रुपयाचे अवमूल्यन आणि सरकार – काही निरीक्षणे

इमेज
  आपल्या सगळ्यांसारखाच जे काही चाललंय – म्हणजे रुपयाचे अवमूल्यन , इंधन किंमती वाढणे किंवा वाढायची शक्यता , महागाई आणि त्याबाबत सरकारची धोरणे ह्याचा विचार मी करतो. मला त्यात पेच हा होता कि सरकारकडे ह्या प्रश्नाबाबत पुरेशी माहिती आहे, कदाचित अशीही माहिती आहे जी बाकी सगळ्यांना उपलब्ध नाही, पण तरीही अनेक तज्ज्ञ सरकारला देत असलेला सल्ला – रुपयाच्या किंमतीत हस्तक्षेप करू नका , पडू द्या , त्याचे परिणाम जे व्हायचे ते होऊ द्या – आणि प्रत्यक्षातले सरकारचे निर्णय ह्यांत तफावत का आहे. मग माझ्या लक्षात आलं कि फरक दृष्टीच्या पल्ल्याचा आणि उद्दिष्टांचा आहे. त्यातून मी माझी काही निरीक्षणे मांडत आहे. हा सरकारच्या धोरणांचा बचाव नाही. रुपयाची किंमत आणि इंधनाची किंमत ही सरकारी हस्ताक्षेपावाचून ठरावी आणि त्यातून जी होईल ती पिडा आपण सहन करावी ह्या भूमिकेला माझी सहानुभूती आहे. पण ही भूमिका आपण ज्या सामाजिक-राजकीय अवस्थेत आहोत त्याच्याशी विसंगत आहे. मायबाप सरकार ते स्पर्धात्मक बाजारपेठेपासून अलिप्त सरकार हा प्रवास आपण नुकताच सुरु केलेला आहे आणि त्यातही निवडणुका आल्या कि आपण मायबाप टोकाकडे जातच असतो....

सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक हित, आणि न्यू नॉर्मल

इमेज
  डॉ. अजित कानिटकर ह्यांचा ‘ गणेशोत्सव ‘न्यू नॉर्मल ’ करता येईल का?’ हा लेख २८ ऑगस्ट २०२२ च्या लोकसत्तामध्ये प्रकाशित झाला आहे. उपरोध आणि पर्यायी मांडणी ह्यातून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सध्याची म्हणजे ‘नॉर्मल ’ स्थिती ही वाईट आहे हे स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या मताशी महाराष्ट्रातील अनेकजण मागची अनेक वर्षे सहमत असतील. अशा अनेकांची भूमिका मांडल्याबद्दल डॉ. कानिटकर ह्यांचे अभिनंदन. स्त्रोत   त्यांच्याच मांडणीला पुढे नेऊन थोड्या अधिक स्पष्ट शब्दात सार्वजनिक गणेशोत्सवातून होणारी सामाजिक मूल्यनिर्मिती ही अत्यंत क्षुल्लक असून केवळ आर्थिक आणि राजकीय हेतूंसाठी सार्वजनिक सुविधांवर ताण आणणारा सार्वजनिक गणेशोत्सव चालतो असं मी म्हणणार आहे. त्याचे हे बदललेले स्वरूप लक्षात घेऊन त्याच्याबद्दलची धोरणेही बदलली जावीत आणि आपले आकलनही बदलावे अशी माझी मांडणी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात थोर नेत्यांनी लोकांमध्ये जागृती , प्रबोधन व्हावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असं आपण शालेय वयापासून ऐकतो. आता रात्री १० वाजले कि केव्हा विसर्जन मिरवणुकीतील आवाज थांबेल ह्याची प्रतीक्षा करताना मल...