पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रुपयाचे अवमूल्यन आणि सरकार – काही निरीक्षणे

इमेज
  आपल्या सगळ्यांसारखाच जे काही चाललंय – म्हणजे रुपयाचे अवमूल्यन , इंधन किंमती वाढणे किंवा वाढायची शक्यता , महागाई आणि त्याबाबत सरकारची धोरणे ह्याचा विचार मी करतो. मला त्यात पेच हा होता कि सरकारकडे ह्या प्रश्नाबाबत पुरेशी माहिती आहे, कदाचित अशीही माहिती आहे जी बाकी सगळ्यांना उपलब्ध नाही, पण तरीही अनेक तज्ज्ञ सरकारला देत असलेला सल्ला – रुपयाच्या किंमतीत हस्तक्षेप करू नका , पडू द्या , त्याचे परिणाम जे व्हायचे ते होऊ द्या – आणि प्रत्यक्षातले सरकारचे निर्णय ह्यांत तफावत का आहे. मग माझ्या लक्षात आलं कि फरक दृष्टीच्या पल्ल्याचा आणि उद्दिष्टांचा आहे. त्यातून मी माझी काही निरीक्षणे मांडत आहे. हा सरकारच्या धोरणांचा बचाव नाही. रुपयाची किंमत आणि इंधनाची किंमत ही सरकारी हस्ताक्षेपावाचून ठरावी आणि त्यातून जी होईल ती पिडा आपण सहन करावी ह्या भूमिकेला माझी सहानुभूती आहे. पण ही भूमिका आपण ज्या सामाजिक-राजकीय अवस्थेत आहोत त्याच्याशी विसंगत आहे. मायबाप सरकार ते स्पर्धात्मक बाजारपेठेपासून अलिप्त सरकार हा प्रवास आपण नुकताच सुरु केलेला आहे आणि त्यातही निवडणुका आल्या कि आपण मायबाप टोकाकडे जातच असतो....

सरकार बाईकटॅक्सीच्या मागे हात धुऊन का लागले आहे?

इमेज
स्त्रोत: इन्टरनेट    महाराष्ट्र सरकारचे बाईकटॅक्सीबाबतचे धोरण - ज्यातला ताजा भाग म्हणजे सरकारने १३ मे २०२६ रोजी घेतलेला बंदीचा निर्णय-  हे विसंगत आहे. प्रवाश्यांच्या सुरक्षेची काळजी हे कारण जरी पुढे केलं जात असलं तरी त्यातून काढला जाणारा निष्कर्ष -  बाईकटॅक्सीवर बंदी – हे चुकीचे आहे. सोशल मिडीयावर उमटलेल्या प्रतिक्रिया दर्शवतात तसं रेग्युलेशन करा , बंदी नको हा निष्कर्ष योग्य आहे. पण त्यापलीकडचे आणि अधिक पायाभूत मुद्दे आहेत ते म्हणजे सरकारची यूनियनबाज टॅक्सी आणि रिक्षा , app नुसार चालणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा, आणि बाईकटॅक्सी ह्या तीन गटांना दिली जाणारी भेदभावाची वागणूक आणि मार्केट हा किमान हानीचा पर्याय असताना त्यात हस्तक्षेप करून केवळ एका गटाच्या हितासाठी समाजाची आर्थिक हानी करणं.        बाईकटॅक्सी चालक हे वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत ह्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण ते एकटेच नियम तोडणारे खलनायक नाहीत. मुळांत वाहतूक नियम हा आपल्या सार्वजनिक जीवनातील एक अत्यंत लाजीरवाणा मुद्दा आहे. बहुतेक नागरिक हे घाबरट असतात त्यामुळे अनेकदा स...