श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

लॉकडाऊन से क्या होता है?: कल्याण-डोंबिवलीच्या लॉकडाऊनचा प्रयोग आणि पुढे काय?

मी ह्या आधी लिहिलं होतं कि लॉकडाऊनचा प्रभाव कळायला साधारण १० दिवस जाऊ द्यायला हवेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये २ जुलै २०२० ते १९ जुलै २०२० असे १८ दिवस लॉकडाऊन होतं. म्हणजेच १२ जुलै २०२० ते २९ जुलै २०२० ह्या कालावधीतील आकडेवारीत लॉकडाऊनचा काय फरक असेल तो दिसायला हवा. सोबतच्या आकृती-१ मध्ये हे स्पष्ट दिसेल कि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊनच्या काळात केसेसचा ट्रेंड कोसळायला सुरुवात झालेली आहे. 7-day moving average नावाचा प्रकार ट्रेंड बघायला वापरला जातो. (केशरी रंगाची वक्ररेषा) तो पाहता केसेस घटण्याचा ट्रेंड स्पष्ट आहे. आणि त्यात हेही दिसेल कि साधारण १२ जूनपासून, म्हणजे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून १० दिवसांनी आपल्याला हा ट्रेंड खाली वळलेला दिसतो. 


आकृती-१ 

लॉकडाऊन नसतं तर काय झालं असतं ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर द्यायचा ठीकठाक प्रयत्न आता करता येऊ शकतो. आधीच्या लेखात स्पष्ट केलेलं त्या forecasting तंत्राने पाहिलं तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १२ जुलै ते २९ जुलै ह्या काळात लॉकडाऊन नसते तर मध्यवर्ती अंदाजानुसार (आकृती-२ मधील निळी रेषा) १२२७७ केसेस दिसायला हव्या होत्या. प्रत्यक्षात ७१५७ केसेस दिसल्या आहेत. म्हणजे सुमारे ५१०० केसेस कमी! कल्याण-डोंबिवलीत २९ जुलै २०२० रोजी १९३५५ केसेस आहेत. म्हणजे लॉकडाऊननसते तर त्या २४५०० च्या आसपास असत्या. म्हणजे लॉकडाऊनने जवळपास २०% केसेस कमी केलेल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीत कोव्हीड-१९ चे मृत्यू आणि एकूणकेसेस ह्यांचे प्रमाण सध्या सुमारे २% आहे. म्हणजे लॉकडाऊनमुळे १०० व्यक्तींचे प्राण वाचले आहेत! हा एक definitely जमेचा मुद्दा आहे. महानगरपलिका, पोलीस आणि screening मध्ये सहभागी व्यक्ती ह्यांना त्याचे श्रेय दिले पाहिजे. 
 आकृती-२ 


अर्थात लॉकडाऊनने जीव (जान) वाचवले आहेत ते लोकांच्या समृद्धीची (जहां) किंमत देऊनच! लोकांचा व्यापार-उदीम, रोजगार ह्या काळात बुडाला, पण त्यांना असणारा धोका कमी झाला. लॉकडाऊनच्या काळात महानगरपालिकेने कोव्हीड-१९ साठी उपलब्ध बेड्सची संख्या ६६२ वरून १०२२ पर्यंत वाढवली. ICU बेड्स ६५ ने तर २१ ventilators वाढले. अर्थात जे ३६० बेड्स वाढले आहेत त्यांत १८५ बेड्स हेच नवे आहेत, बाकीचे आधीपासून अस्तित्वात असलेल्या हॉस्पिटल्सना कोव्हीड-१९ हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करून झालेले आहेत. कोव्हीड-१९ शिवाय अन्य आजार, व्याधी ह्यांनी त्रस्त रुग्णांची गैरसोय हा तोटा  राखीव बेड्समुळे निर्माण झालेला आहे. लॉकडाऊन आणि वाढत्या केसेसच्या काळातील अजून एक बदल म्हणजे रुग्णउपचाराचे बदलते प्रोटोकॉल्स. मिळेल त्या प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात भरती करणे हे जाऊन गरज तिथेच रुग्णालय अन्यथा केवळ विलगीकरण. माझ्या मते मर्यादित रीसोर्स वापरण्याचा हाच उपलब्ध मार्गांत योग्य मार्ग आहे. (ह्या प्रोसेसबाबत अनेक वंदता आहेत. पण त्यात सांगोवांगी, कुजबूज जास्त आणि पक्का डेटा नाही अशी अवस्था आहे.) नव्या रुग्णालयांना परवानगी देणं, खाजगी विलगीकरण सेवा, नर्सिंगचे rapid डिप्लोमा अशा काही मध्यम पल्ल्यांच्या पर्यायांचाही विचार करण्याची गरज आहे. 

लोकांचा परस्परसंपर्क हा विषाणूप्रसाराचा महत्वाचा घटक आहे. हा परस्परसंपर्क कमी केला कि विषाणूप्रसार कमी हे साधे तत्व लॉकडाऊनपाठी आहे. लोकांच्या परस्परसंपर्कात वस्तूंची ऑफलाईन खरेदी-विक्री ही मोठी बाब असते. तीच जर बंद ठेवली तर विषाणूप्रसार घटेल. आणि हेच लॉकडाऊनने केलेलं आहे. ह्यांत नवल काही नाही. पण अनेकदा दिसणारे आकडे हे लॉकडाऊन व्यर्थ असल्याचा आभास निर्माण करतात. ते नीट समजून कसे घ्यावेत हे दाखवायला हा प्रयत्न! 

मग पुढे काय? 


लॉकडाऊनमुळे केसेस कमी होतात ह्याचाच दुसरा अर्थ लॉकडाऊनचा प्रभाव संपला कि केसेस वाढू शकतात. पण जर प्रसाराची संभावनाच कमी झाली असेल तर? 
मागच्या काही दिवसांत आपण Sero-prevalence सर्व्हेजबद्दल वाचलं असेल. दिल्लीत २३% लोकांपर्यंत, मुंबईत २५% लोकांपर्यंत, मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये ५७% लोकांपर्यंत कोरोनाविषाणू पोचला असण्याची शक्यता ह्या सर्व्हेनी व्यक्त केलेली आहे. विषाणूबाधा लोकसंख्येच्या एका ठराविक प्रमाणात होऊन गेली कि ते लोक विषाणूला immune होतील आणि त्यातून रोगाच्या प्रसाराला आळा बसेल, म्हणजेच herd immunity येईल असे साठीच्या रोगांबद्दल मानले जाते. कोव्हीड-१९ साठी हे प्रमाण किती आहे हे आपल्याला फारसे ठोस माहिती नाही. १०% ते २/३ असे सारे होरे त्यासाठी आहेत. पण विषाणूसंक्रमित लोकांचे प्रमाण जितके जास्त तेवढे आपण herd immunity च्या जवळ हा तर साधा तर्क आहे, अर्थात कोव्हीड-१९ ला  herd immunity आहे हे गृहीत धरून! 

मुंबईत आजच्या घडीला १ कोटी (१.३ कोटी लोकसंख्या वजा गावी परत गेलेले स्थलांतरित) लोकांत ११२००० केसेस दिसून आलेल्या आहेत आणि मुंबईत २५ लाख लोकांपर्यंत विषाणू पोचलेला असावा असा अंदाज आहे. कल्याण-डोंबिवलीत १२ लाख लोक  आहेत असे मानू (२०११ ची लोकसंख्या) आणि केसेस आहेत सुमारे १९३५५.  मुंबईत हजार लोकांमागे ११ केसेस आहेत तर कल्याण-डोंबिवलीत १६! त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील विषाणूप्रसाराचे प्रमाण मुंबईहून अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Thyrocare ने ५० हून अधिक केसेस असलेल्या पिनकोडसना जे सर्व्हे केले आहेत त्यात कल्याण-पुर्वेमध्ये ४७% असे प्रमाण आढळलेले आहेत.  

२५% प्रमाण असताना आणि लॉकडाऊन नसतानाही  मुंबईत मागच्या काही दिवसांत, म्हणजे जवळपास मागच्या दीड-दोन  महिन्यांत केसेसचा भडका उडालेला दिसत नाही. दिल्लीत आणि चेन्नईमध्येही परिस्थती रुळावर येत आहे. (आकृती ३,४,५)


आकृती-३ 

आकृती-४ 

आकृती-५ 

मग विषाणूप्रसार अजून जास्त असल्याची शक्यता असणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतही केसेस स्टेबल किंवा घटत्या होतील अशी आशा करायला भरपूर वाव आहे. अर्थात ही आशा करताना आपण आपला परस्परसंपर्क मर्यादित ठेवू, मास्क लावू आणि बंदिस्त जागेतील मोठे एकत्रीकरण टाळले जाईल असे आपण गृहीत धरतो आहोत. आणि हेही कि एकदा आलेला विषाणू परत आला तर काही करणार नाही. 
मुंबईत ७५% लोकांना विषाणूबाधा होणे बाकी आहे आणि  ५ ऑगस्ट २०२० च्या अनलॉक- ३ पासून आर्थिक चक्र जसे परत वेगाने फिरायला लागेल तसे शहरातील लोक वाढू शकतात. ह्या नव्या संभाव्य बाधित लोकांमार्फत मुंबई महानगर परिसराच्या परिघावरील शहरांत विषाणू  येतच राहणार. ज्या लोकल ट्रेनला आपण लाइफलाईन म्हणतो ती इथे आपली फाशीची दोरीही आहे! (लोकल ट्रेनमुळे केसेस किती वाढल्या हे नंतर एकदा लिहीन) 
त्यामुळे पुढे काय ह्याचे उत्तर आहे सावध आशावाद, अर्थात cautious optimism. केसेस वाढण्याचा वेग वाढण्याची  शक्यता भरपूर आहे, पण त्याचवेळी शहरभर नसेल तरी काही ठिकाणी हा वेग सावकाश व पडता राहण्याचीही मर्यादित  शक्यता आहे.  

आपण आता कोव्हीड-१९ च्या भीतीला सरावलो आहोत. मृत्यूची भीती सांख्यिकीच्या दृष्टीने फारच कमी म्हणजे अगदी ०.०१ %-०.१% आहे असेही कदाचित असेल. पण ज्याचे मरण आहे त्याला, त्याच्या सोबतच्याना ते वेदनादायकच आहे. जून २०२० ते २९ जुलै २०२० मध्ये कल्याण-डोंबिवलीत २८६ मृत्यू कोव्हीड-१९ मुळे झालेले आहेत. आपल्यातल्या अनेकांना त्यातले अनेकजण माहितीही असतील आणि हा विषाणू नसता तर ते आज आपल्यासोबतच असते. हे लक्षात ठेवून, आपल्याला पूर्ण वश न झालेल्या ह्या विषाणूला सावध राहूनच प्रतिसाद देणं चांगलं. वैयक्तिक स्तरावर म्हणाल तर बंदिस्त जागांतील मोठी परस्परसंपर्क होता होईतो टाळणे, मास्कवापर, लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे आणि स्थानिक स्तरावरील छोटे दुकानदार, उपजीविकेसाठी काही व्यवसाय करू पाहणारे नवे उद्योजक ह्यांना शक्य तितके खरेदीयुक्त प्रोत्साहन. 

विषाणूला बळी पडलेले लोक परत येणार नाहीत. त्यांच्या, उपजीविका गमावलेल्या लोकांच्या वेदनादायी  अनुभवांतून निर्माण झालेले शहाणपण आपण नीट वापरायला हवे. In some sense, we owe it to them. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसंगत प्राणीदयेची समस्या

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा