श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

कर्नाटकातील कॉलेजांतील बुरखा/हिजाब वादाच्या निमित्ताने

 कर्नाटकातले हिजाब (आणि नकाब/बुरखा, ज्याचा फारसा उल्लेख होत नाही. पण योग्य संज्ञा बुरखा हीच आहे. ट्विटरवरच्या क्लिप्समध्ये विद्यार्थिनी अंगभर आणि चेहरा झाकणारा बुरखा घालत आहेत हे स्पष्ट आहे.) हे प्रकरण गाजते आहे. मुलींच्या शिक्षणापुढे हिजाबचा मुद्दा गौण आहे आणि त्यामुळे त्यांना हिजाब घातल्याने कॉलेजात प्रवेश नाकारला जातो आहे हे चूक आहे – अशी एक सर्वसाधारण मांडणी आहे. अशा प्रकरणात असतं तसं आपल्याकडे स्पष्ट डीटेल्स नाहीत. कदाचित ते कधीही येणारही नाहीत.

Most realistic possibility – बुरखा घालणं ही बाब अशा कॉलेजातील नियमित बाब (स्टेटस को) नव्हती. मध्येच केव्हातरी ही बाब सुरु झाली. हिंदू वर्चस्ववादी विचारसरणीच्या बाजूने हा बदल मुस्लीम identity चे public space मध्ये assertion अशा पद्धतीने घेतला. असे assertion हे त्यांच्या राजकीय भूमिकेच्या विरोधात असल्याने (भारतात केवळ हिंदूच असे assertion करू शकतात, अन्य नाही अशी भूमिका) त्यांनी ह्या बदलाला विरोध सुरु केलेला आहे.

जर कॉलेजात गणवेश असेल तर गणवेशाच्या नियम आणि संकेताशिवाय अन्य बाबी निषिद्ध ठरतात. मुद्दा हा आहे कि अनेकदा अशा नियम आणि संकेतात मुभा असणे किंवा नसणे स्पष्ट नसलेल्या अनेक बाबी असतात. उदाहरणार्थ,  अनेकदा गणवेशात स्वेटरचा (थंडीच्या कपड्यांचा) अंतर्भाव नसतो. विद्यार्थी थंडीच्या दिवसांत त्यांना हवे ते स्वेटर वापरू शकतात. ह्या न्यायाने बुरख्यालाही विरोध करण्याची गरज नाही. केवळ ह्या बुरख्यातील चेहरा झाकण्याच्या प्रकारच्या बाबतीत तसे करण्यास मनाई करायला हवी. चेहरा ही आपली प्राथमिक ओळख असल्याने आणि ती आपण वैध घटक आहोत हे निश्चित करत असल्याने चेहरा झाकणं निषिद्ध ठरवण्याचा अधिकार कॉलेजला आहे.

त्यामुळे मुस्लीम विद्यार्थिनींचा बुरखा, त्यांना विरोध करणाऱ्यांचे स्कार्फ, अगदी उद्या एखादा विद्यार्थी बुरखा घालून आला तरी ते थांबवायची गरज नाही. अशी वेशभूषा करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनीने गणवेश घातला आहे का नाही ह्याची पडताळणी करण्याचा हक्क मात्र कॉलेजला आहे.

कॉलेजात गणवेश असेल तर कॉलेज परिसरात गणवेश इतरांना दिसेल अशा पद्धतीने परिधान केलेला असावा, त्यावर अन्य आवरण असू नये अशी सक्ती कॉलेज करू शकते. असे केले तर बुरखा बाद ठरेल, हिजाब (चेहऱ्याभोवती वेढलेले वस्त्र ह्या अर्थाने) नाही जोवर असे काही वेढणे हे निषिद्ध ठरवले जाते. कॉलेजने असे केले तर स्वेटर इत्यादी बाबीही गणवेशसुसंगत पुरवल्या जाव्यात. पण असा नियम करणे हा केवळ अट्टाहास आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना गणवेश हवाहवासा असतो ह्यापलीकडे गणवेश असण्याचे काही समर्थन नाही. आणि ही बाब साधली जाईल इतपत गणवेश नियम आणि संकेत पुरेसे आहेत. त्याच्यापुढे जाऊन हे नियम व्यक्तिगत प्राधान्याच्या आड आणण्याची गरज नाही. पण असे आणण्याचा अधिकार/स्वातंत्र्य खाजगी संस्थेला आहे. ख्रिश्चन शाळा असे स्वातंत्र्य अनेक वर्षे वापरत आहेत.     

गणवेश सक्ती नसेल तर चेहरा न कळण्याइतपत (जसा वैद्यकीय मास्कमधून कळतो) झाकू नये ह्याशिवाय काहीच म्हणता येत नाही. अशा ठिकाणी बुरखा निषिद्ध ठरवणे गैर आहे. बुरखा, भगवे स्कार्फ, पगडी असे काहीही विद्यार्थी वापरू शकतात.

शिकणाऱ्याच्या कपड्यांचा काय संबंध, तिला/त्याला शिकू द्यावे – आणि त्यामुळे माझी वरची विधाने whataboutery आहेत असे वाटू शकते. पण मला असं वाटत नाही.

बुरखा घालू पाहणाऱ्या व्यक्तीला तिच्या प्राधान्याचा अविष्कार ह्या स्वातंत्र्याच्या न्यायाने अडवले जाऊ नये ही बाब मला मान्य आहे. पण काही विद्यार्थिनींना एकदम बुरखा का वापरावासा वाटला ही बाब नजरेआड करण्याजोगी नाही. बुरखा ह्या वेशभूषेपाठी एक विशिष्ट धार्मिक विचारसरणी आहे, जी व्यक्तीस्वातंत्र्याचा अनादर करणारी आहे. त्यामुळे अशा कपड्यांच्या बाबतीत आपले एक सार्वजनिक नकारात्मक मत आहे.

       बुरखा घालणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही कारणास्तव हा निर्णय घेतला असेल, आपण तिच्या कपड्यांकडे तिची निवड म्हणून बघायला हवे असेही आपण म्हणू शकतो. बुरखा घालण्याच्यापाठी त्या व्यक्तीचे indoctrination असो वा नसो, त्या indoctrination च्या भयास्तव त्यांना त्यांचे आचारस्वातंत्र्य नाकारले जाऊ शकत नाही ही भूमिका योग्य आहे, पण अनेकदा ती सुसंगतपणे घेतली जात नाही.

इथे मला नुकतीच वाचनात आलेली आपल्या अपत्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ देण्याबाबतची फेसबुक चर्चा मला आठवते आहे. शाखा ही indoctrination चे माध्यम आहे (आपले ते संस्कार/घडवणे आणि बाकीच्यांचे ते नादी लावणे अशी आपली indoctrination ची व्याख्या असते.) ह्यांत दुमत नाही. मुद्दा हा आहे कि जर तिथे जाणाऱ्या व्यक्तींच्या indoctrination ची आपल्याला चिंता असेल तर बुरखा घालणाऱ्या व्यक्तीच्या indoctrination ची का नाही? आम्ही अमुक आहोत म्हणून आम्ही शाखेच्या बाबतीत भूमिका घेऊ, बुरख्याबाबत भूमिका ही आमची जबाबदारी नाही हा विसंगत बचाव आहे.

चेहरा कळेल अशा पद्धतीच्या कोणत्याही वेशभूषेत विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना कॉलेजात येऊ द्यावं. पण जर त्यांच्या वेशभूषेत अचानक बदल झाला असेल, आणि हा बदल व्यक्तीला दुय्यम मानणाऱ्या विचारसरणीच्या आचारांशी जुळणारा असेल तर अशा बदलाचीही छाननी व्हावी.

माझी मांडणी विद्यार्थिनींच्या वागण्याला आक्षेप घेणाऱ्या गटाचे समर्थन वाटू शकते. पण केवळ नी-जर्क निषेधाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा माझा प्रयत्न आहे. दुसऱ्या व्यक्तीचे वागणे आपल्याला भौतिक हानी पोचवत नाही तोवर आपण ते सहन करणे योग्य आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या बुरखा घालण्यावर घेतलेला आक्षेप गैर ठरतो. पण आक्षेप घेणे गैर ठरले तरी ज्या बदलामुळे हा आक्षेप आलेला आहे त्या बदलाचा विचार करणे गैर ठरत नाही.

ह्या सगळ्या प्रकारात मुस्लिमांना डिवचणे आणि त्यांच्या धार्मिक अभिव्यक्ती संकुचित करण्याचा आनंद मिळवणे ही बाब आहे ह्याबाबतही दुमत नाही. बुरखा प्रकरण ह्याच रस्त्याने जाऊन बुरख्यावर कॉलेजात प्रतिबंध योग्य अशा अवस्थेला जाईल हीच शक्यता आहे. अशा अवस्थेत नैतिकदृष्ट्या विसंगत काही नाही. बुरखा वापरू देण्याचा पण त्याचवेळी असं का घडलं हे जाणून घेण्याचा बरा रस्ता आपल्याला सोडावा लागणार आहे. ढोबळ विजयी भावना आणि सहानुभूती ह्यापलीकडे असलेले सूक्ष्म आकलन तेवढे सुटू नये.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसंगत प्राणीदयेची समस्या

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

कसबा पेठ पोटनिवडणूक: मत न देऊन अवलक्षण?