पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

रस्ता अपघाताने जी.डी.पी. वाढतो – सोपी आणि चुकीची विधाने कशी असतात?

इमेज
       आज फेसबुकवर मला ही पोस्ट वाचायला मिळाली.  ही पोस्ट साधारणपणे वैचारिक भूमिकेतून आपले फेसबुक चालवणाऱ्या आणि मध्ये-मध्ये लेख वगैरे छापून आणणाऱ्या व्यक्तीने टाकली होती. ‘सायकल चालवणे हे अर्थव्यवस्थेला घातक आहे ’ अशा आशयाचे हे विधान त्यांना पटले आहे का नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेले नाही. पण ह्या पोस्टने मला एकूणच लोकांच्या अर्थशास्त्रीय संकल्पनांच्या तोकड्या समजेची जाणीव झाली. आणि इथे लोक म्हणजे वैचारिक भूमिका असणारे लोक अशा अर्थाने मी लोक हा शब्द वापरतो आहे.        आपण ह्यांना वाईट मानतो अशा घटना घडल्याने जी.डी.पी. वाढतो, अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे अशा विद्रूप मोजमापावर आधारित आधुनिक अर्थव्यवस्था ही विनाशकारी होय अशा आशयाची मांडणी मी पहिल्यांदा दिलीप कुलकर्णी ह्यांच्या ‘निसर्गायण ’ ह्या पुस्तकात वाचली. (प्रकरण: नवं नातं , पान ८७, नोव्हेंबर २००५ आवृत्ती). त्यात ते म्हणतात अपघात वाढले कि अनेक गोष्टी , सेवा ह्यांची खरेदी-विक्री होते आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते असे त्यांचे विधान आहे. आणि म्हणून ‘अधिक अपघात म्हणजे अधिक विकास ’ असा निष्कर्ष त्यांनी काढले

फुटपाथवर आयब्रो: मूलभूत आहे मार्केट

इमेज
     मी मागच्या पोस्टमध्ये म्हटलेलं कि मी व्यसनांच्या बाबतीत पुढची पोस्ट लिहीन. पण आज मला एक विलक्षण दृश्य पाहायला मिळालं ज्यामुळे मी विषय बदललेला आहे. तर ते दृश्य म्हणजे: ४ स्त्री रहिवासी त्यांच्या इमारतीच्या आसपास, त्या बिल्डींग्स किंवा स्थानिक नगरसेवक ह्यांनी ठेवलेल्या बेंचेस आणि जवळच्या कठड्यापाशी होत्या. लांबून मला जे दिसलं त्यानुसार त्यातली एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या मांडीवर डोकं ठेवून पडली होती , तिसरी स्त्री मांडीवर डोके ठेवलेल्या स्त्रीवर झुकलेली होती आणि चौथी ह्या तिघींच्या जवळच आडोसा केल्यासारखी उभी होती.        सुरुवातीला मला वाटलं कि त्या पडलेल्या स्त्रीला चक्कर वगैरे आली आहे. पण काही पावले पुढे जाताच मला दिसलं कि मांडीवर डोके ठेवून पडलेल्या स्त्रीच्या भुवया तिच्यावर झुकलेली स्त्री तासत आहे. मला अशा सौंदर्यप्रक्रियांची जितपत माहिती आहे त्यानुसार ह्या प्रक्रियेला आयब्रो म्हणत असावेत (चू.भू. द्या.घ्या.)        मार्केट बदलत्या अवस्थेला अनुसरून डिमांड-सप्लाय प्रक्रियेत कसे बदल घडवून आणतं आणि डिमांड-सप्लाय एकमेकांना छेदतातच (आपल्यातल्या अनेकांनी एकमेकांना छेडणारे डिमांड-

डिमांड-सप्लाय तेथे मार्ग: घरकाम उदाहरण

मार्केट हे अत्यंत मूलभूत आहे. लोकांच्या गरजा आणि ते पुरवणं हे माणसे खूप पूर्वीपासून करत आहेत. ह्या गरजांची पूर्ती करण्यासाठी वेगवेगळे मार्ग लोक चोखाळत आली आहेत. ह्यातले काही मार्ग बंद झाले कि काहीकाळ असे मार्केट बंद होते , पण बहुतेकदा पर्यायी मार्ग शोधला जातोच. आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेले उदाहरण म्हणजे १४५२ मध्ये इस्तंबूल ऑटोमन ताब्यात गेल्यावर भारताशी व्यापाराचा खुष्कीचा मार्ग अडचणीत आल्याने युरोपियन व्यापाऱ्यांनी सागरी मार्गांचा अवलंब वाढवला. कोव्हीड-१९ लॉकडाऊनमध्येही वस्तू/सेवा विक्रीचे अनेक प्रस्थापित मार्ग अडचणीत आले. पण त्यावर लोकांनी तोडगे काढलेच. त्यातले एक उदाहरण म्हणजे घरगुती सेवा जसे , धुणे , भांडी , पाल्यांची काळजी, वृद्धांची/रोग्यांची काळजी, पुरवणाऱ्या व्यक्ती. कोरोनाने व्यक्ती-व्यक्तीमधल्या संपर्कालाच मोठा धोका बनवले. अशावेळी विश्वासू संबंध म्हणजे कुटुंबीय सोडून बाकी सर्वांसोबत भौतिक अंतर राखण्याचा पर्याय आपल्याला निवडायला लागला. साहजिक आहे कि ह्या उघड विश्वासाच्या वर्तुळाबाहेरील व्यक्तींना आपण लॉकडाऊनमध्ये आपल्या संपर्कात येण्यापासून थांबवलं. कितीही जवळची अ