पोस्ट्स

लोकल ट्रेनचा बारमाही मरणऋतू आणि आपले शहाणपण

  आज म्हणजे ९ जून २०२५ रोजी पाच लोक ट्रेनमधून पडून मेले आहेत. तसे एक-दोन रोजच मरत आहेत. काही वर्षांपूर्वी, अगदी दसऱ्याच्या काही दिवस आधी ३० एक लोक रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरीत मेले आहेत. विकासाच्या रथाला असे किडूक मिडूक बळी लागणार अशीच आपली भूमिका असली पाहिजे. कारण नाहीतर आपल्याला विचार करायला लागणार आणि ती गोष्ट आपल्या बौद्धिक, व्याख्याने , आणि सोशल मिडीयाला चटावलेल्या मेंदूला त्रासदायक ठरू शकते. तर ज्यांना हा त्रास करून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या जोखमीवर पुढे वाचावे. पहिली बाब म्हणजे लोकल ट्रेन्स ही मुंबईची लाइफलाईन नाही. तो मुंबईचा आजार आहे. आणि मुंबईचा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जी मुंबईची नाजायज अपत्ये असलेली शहरे किंवा धर्मशाळा आहेत त्यांचा तो आजार आहे. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे १८७० पासून , मुंबईच्या केंद्रवर्ती भागातील गर्दी बाहेर फेकायचा उपाय म्हणून ट्रेन्स वापरल्या गेल्या आहेत. आजही लोकल ट्रेन आणि मेट्रो हेच, म्हणजे मुंबईतील एलिट आणि धनाद्य कुटुंबांची घरे स्वस्त करणे आणि जीवनाची गुणवत्ता वाढवणे , हेच काम करत आहेत. शहरीकारणाचा थोर अभ्यास असलेले...

श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण अस...

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

इमेज
 लोकसत्तात काहीसा संक्षिप्त लेख प्रकाशित झाला आहे. ( दुवा ) मूळचा लेख इथे देत आहे.  ‘ट्रॉली प्रॉब्लेम’ हा नैतिकशास्त्रातले एक उदाहरण किंवा संकल्पना आहे. तुमच्याकडे तर एक कृती करण्याची किंवा न करण्याची निवड आहे. केली तर ५ व्यक्ती वाचणार आणि १ मरणार आणि नाही केली तर १ वाचणार आणि ५ मरणार. तर तुम्ही कृती करणार का नाही हा तो ट्रॉली प्रॉब्लेम. हा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर अशी बरीच शक्यता आहे कि तुम्ही कृती करण्याची निवड केली असेल. कारण १ व्यक्ती मरणे हे ५ व्यक्ती मरण्यापेक्षा बरे. ट्रॉली प्रॉब्लेमच्या अनुषंगाने आपल्याला मानवी वर्तनातील एक महत्वाची विसंगती दिसते. आपण आपल्या मनात आपल्या कुटुंबाच्या बाहेरील लोकांचे मूल्यमापन करताना संख्येने प्रभावित होत असतो. जितके जास्त लोकांचे नुकसान तितके ते अधिक लक्षवेधक ठरते. २५ जण मृत्युमुखी पडलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ही विसंगती आणि आपल्या काळाचा व्यवच्छेदक असा वेगविकार दिसून आलेला आहे.  अपघातातील बळींचा आकडा मोठा आहे ह्यामुळे त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियाही जास्त आहेत. पण असं म्हटलं तर असं म्हणणाऱ्यालाच लोक अपघाताचे...

विसंगत प्राणीदयेची समस्या

 २६ जून २०२३ च्या लोकसत्ता मध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येबद्दल विश्लेषणात्मक लेख आहे. लेखातला गोंधळात टाकणारा प्रकार म्हणजे भारतात प्रचंड प्रमाणात कुत्र्यांचे अवांछित चावे ही समस्या सुरुवातीला मांडून पुढे हे चावे ही माणसांचीच कशी चूक आहे हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे भटके कुत्रे नव्हे तर राहती माणसे हीच समस्या असा तो लेख होतो. अर्थात प्राणीमित्र नावाच्या प्रजातीचा दृष्टीकोन प्रातिनिधिकदृष्ट्‍या मांडणारा लेख असं पाहिलं तर ही विसंगती नसून गुणधर्म आहे हे लक्षात येतं. (पण हा वोक लेख नाही हा. असा आळ येऊ नये म्हणून सुरुवातीलाच सरमाच्या उल्लेखाची तीट लावलेली आहे.) मुळात भटक्या कुत्र्यांची समस्या नाही. समस्या त्यांच्याबद्दल चुकीचे धोरण असण्याची आहे. भटके कुत्रे रस्त्यावर नसणे हेच सामाजिक धोरणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. त्यामुळे भटक्या कुत्र्‍यांना त्यांच्यासाठी चालवण्यात येणाऱ्या shelters दाखल करणे आणि तिथे स्वयंसेवी संस्थांनी त्यांची काळजी घेणे, shelters मधील पात्र प्राणी हे ज्यांना प्राणी पाळायचे आहेत त्यांनी आपल्या घरी नेणे, आणि जे भटके कुत्रे shelters मध्ये राहू शकत नाहीत अशां...

कोव्हीडची ३ वर्षे: काही निरीक्षणे

इमेज
  कोव्हीडची आणि आपली गाठभेट झाली त्याला ३ वर्षे झाली. ह्या ३ वर्षांबद्दल ही काही निरीक्षणे आहेत. source: internet १.       कोव्हीडच्या ज्या लक्षणीय आठवणी असणार आहेत त्यातली एक आहे लॉकडाऊन. लॉकडाऊनमुळे आरोग्य यंत्रणेला तयार व्हायला वेळ मिळाला. हे लॉकडाऊनचं यश. २.       लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित, रोजंदारीवर अवलंबून कुटुंबे ह्यांची हानी करून बाकी लोकांना वाचवलं गेलं. म्हणजे असं करणं हे लॉकडाऊनचं उद्दिष्ट नव्हतं , पण त्याच्या परिणामांकडे अशा प्रकारे बघता येईल. ही हानी भरून काढण्याचे प्रयत्नही नंतर झाले आणि ते बऱ्याच अंशी यशस्वीही झाले. पण मार्च , एप्रिल , आणि मे २०२० मध्ये भारतातला एक वर्ग लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले त्यात भरडला गेला आणि बाकीचे त्या वेळी कोव्हीड लाटेत सापडण्यापासून वाचले. ३.       अर्थात जगभरातच तेव्हा flatten the curve अशा धोरणांचे वातावरण होते. विषाणू उत्क्रांत होणं , लस हे टप्पे भाकि‍तांच्या कक्षेतही नव्हते. प्रसाराचा वेग कमी करणं ह्यापलीकडे धोरण म्हणून पर्यायही नव्हते. हा वेग कमी...