पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकल ट्रेनचा बारमाही मरणऋतू आणि आपले शहाणपण

  आज म्हणजे ९ जून २०२५ रोजी पाच लोक ट्रेनमधून पडून मेले आहेत. तसे एक-दोन रोजच मरत आहेत. काही वर्षांपूर्वी, अगदी दसऱ्याच्या काही दिवस आधी ३० एक लोक रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरीत मेले आहेत. विकासाच्या रथाला असे किडूक मिडूक बळी लागणार अशीच आपली भूमिका असली पाहिजे. कारण नाहीतर आपल्याला विचार करायला लागणार आणि ती गोष्ट आपल्या बौद्धिक, व्याख्याने , आणि सोशल मिडीयाला चटावलेल्या मेंदूला त्रासदायक ठरू शकते. तर ज्यांना हा त्रास करून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या जोखमीवर पुढे वाचावे. पहिली बाब म्हणजे लोकल ट्रेन्स ही मुंबईची लाइफलाईन नाही. तो मुंबईचा आजार आहे. आणि मुंबईचा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जी मुंबईची नाजायज अपत्ये असलेली शहरे किंवा धर्मशाळा आहेत त्यांचा तो आजार आहे. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे १८७० पासून , मुंबईच्या केंद्रवर्ती भागातील गर्दी बाहेर फेकायचा उपाय म्हणून ट्रेन्स वापरल्या गेल्या आहेत. आजही लोकल ट्रेन आणि मेट्रो हेच, म्हणजे मुंबईतील एलिट आणि धनाद्य कुटुंबांची घरे स्वस्त करणे आणि जीवनाची गुणवत्ता वाढवणे , हेच काम करत आहेत. शहरीकारणाचा थोर अभ्यास असलेले...

११ डिसेंबरच्या डॉक्टरांच्या संपाबद्दल काही निरीक्षणे

पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या आयुर्वेदिक वैद्यांना कोणत्या शस्त्रक्रिया करता येतील ह्याचे नोटिफिकेशन CCIM ने २० नोव्हेंबरला प्रसिद्ध केले आहे. ह्या निर्णयाला Allopathy डॉक्टर्स विरोध करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ११ डिसेंबर २०२० ला डॉक्टरांचा देशव्यापी संप असणार आहे. प्रश्न जरी डॉक्टरांचा असला तरी त्यातील नैतिक प्रश्नाचा भाग विचार करणाऱ्या माणसालाही अभ्यासता येतो. ह्या संपाबद्दल काही नैतिक (असे वागणे चूक का बरोबर) निरीक्षणे नोंदवायचा हा प्रयत्न आहे. त्यातील वैद्यकीय प्रश्नांबाबत माझ्या मतांना काहीही किंमत नाही हे स्पष्ट आहे आणि मी अशी मते व्यक्त न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही झाली असल्यास दिलगीर आहे.   आयुर्वेदिक वैद्यांनी त्यांना सरकारने परवानगी दिलेल्या शस्त्रक्रिया केल्याने   रुग्णांची हानी आहे म्हणून IMA ( Indian Medical Association) विरोध करत आहे. त्यांच्याच पदाधिकाऱ्यांच्या शब्दात ‘..... the purity and identity of Ayurveda stands equally challenged. That the council prescribed modern medicine text books and Ayurveda institutions practiced surgery with the...

MSP, नवे शेती कायदे आणि चालू असलेले शेतकरी आंदोलन

इमेज
  सध्या दिल्लीजवळ चालू असलेल्या, प्रामुख्याने पंजाबमधील शेतकऱ्यांच्या निदर्शनांनी देशाचे लक्ष वेधून घेतलेले आहे. आंदोलकांच्या 6 प्रमुख मागण्या आहेत. 1.      सरकारने नुकतेच आणलेले ३ शेती सुधारणा कायदे रद्द करावेत. 2.      किमान आधारभूत किंमत ( MSP ) ला कायद्याचा दर्जा द्यावा. 3.      MSP ही स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार असावी. 4.      तण ( Stubble) जाळण्यासाठी असलेला कारावास रद्द व्हावा 5.      डीझेलवर ५०% सबसिडी मिळावी 6.      शेतकऱ्यांच्या विरोधातील गुन्हे मागे घेतले जावेत. (स्त्रोत: https://www.indiatvnews.com/news/india/ahead-of-talks-with-govt-farmers-list- 6- demands-msp-key-issue- 668997 ) ह्यातल्या पहिल्या २ मागण्या ह्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत. ह्या दोन मागण्यांचाच विचार प्रामुख्याने ह्या लेखात केलेला आहे. ह्या मागण्या आणि त्या अनुषंगाने हे आंदोलन स्वहिताची मागणी ह्या न्यायाने कसे रास्त आहे (म्हणजे खोट्या समजावर आधारित किंवा काही...