पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकल ट्रेनचा बारमाही मरणऋतू आणि आपले शहाणपण

  आज म्हणजे ९ जून २०२५ रोजी पाच लोक ट्रेनमधून पडून मेले आहेत. तसे एक-दोन रोजच मरत आहेत. काही वर्षांपूर्वी, अगदी दसऱ्याच्या काही दिवस आधी ३० एक लोक रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरीत मेले आहेत. विकासाच्या रथाला असे किडूक मिडूक बळी लागणार अशीच आपली भूमिका असली पाहिजे. कारण नाहीतर आपल्याला विचार करायला लागणार आणि ती गोष्ट आपल्या बौद्धिक, व्याख्याने , आणि सोशल मिडीयाला चटावलेल्या मेंदूला त्रासदायक ठरू शकते. तर ज्यांना हा त्रास करून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या जोखमीवर पुढे वाचावे. पहिली बाब म्हणजे लोकल ट्रेन्स ही मुंबईची लाइफलाईन नाही. तो मुंबईचा आजार आहे. आणि मुंबईचा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जी मुंबईची नाजायज अपत्ये असलेली शहरे किंवा धर्मशाळा आहेत त्यांचा तो आजार आहे. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे १८७० पासून , मुंबईच्या केंद्रवर्ती भागातील गर्दी बाहेर फेकायचा उपाय म्हणून ट्रेन्स वापरल्या गेल्या आहेत. आजही लोकल ट्रेन आणि मेट्रो हेच, म्हणजे मुंबईतील एलिट आणि धनाद्य कुटुंबांची घरे स्वस्त करणे आणि जीवनाची गुणवत्ता वाढवणे , हेच काम करत आहेत. शहरीकारणाचा थोर अभ्यास असलेले...

वैज्ञानिक सत्य आणि हमारा वो ज्ञान-तुम्हारा तो द्वेष

श्रद्धा कुंभोजकर ह्यांनी लिहिलेला आणि ज्यावर बरीच उष्णता निर्माणझाली आहे असा लेख वाचला. लेख हा संशोधनात उपजीविका करणाऱ्या व्यक्तीने लिहिला असला तरी लेखातील मांडणी संशोधकाची नाही , तर राजकारणी भूमिकेची आहे , आणि तीही भाबडी किंवा साळसूद आहे असं माझं मत आहे. हे मत मी आता नीट स्पष्ट करतो.   -- कुठल्याही संशोधकाची जी ध्येये असतात त्यातले प्रमुख काय तर हायपोथेसिस तपासणे. हायपोथेसिस तपासणे म्हणजे काय ? तर अमुक एक विधान आहे किंवा पर्यायी विधान आहे/मूळ विधान नाही ह्यातली एक भूमिका निवडणे आणि मग उरलेली भूमिका सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे. जर आपण उरलेली भूमिका नाकारू शकलो नाही तर आपल्याला आपली मूळ भूमिका नाकारायला हवी. हीच गोष्ट आपण उलटूनही करू शकतो आणि त्यामुळे कदाचित एखाद्या विधानाला आहे म्हणूनही नाकारता येत नाही आणि आहे म्हणूनही नाकारता येत नाही अशा प्रकारची अनिर्णीत अवस्था राहू शकते.        एखाद्या भूमिकेला सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात. हे पुरावे अमुक एक बाजू सिद्ध करतात का नाही हे ठरवण्याचा मार्ग म्हणजे पुराव्यांतील जोरकस प्रवाह (dominant trend/cent...

केस कापण्याचे दर वाढण्यात आश्चर्य नाही

कोव्हीड-१९ ने जगण्या-वाचण्याच्या गंभीर प्रश्नासोबतच अनेक दुय्यम प्रश्नांनाही जन्म दिलेला आहे. तर हा त्यातला एक. १ जून २०२० रोजी अशी बातमी वाचनात आली कि महाराष्ट्र नाभिक महामंडळ ह्या संघटनेने केस कापणे , दाढी इत्यादीचे दर दुप्पट करण्याचे ठरवले आहे. अनेकांना आश्चर्य वाटेल कि आर्थिक मंदी वगैरे बोलले जात आहे अशा काळांत भाव वाढवणे कसे काय योग्य आहे. पण थोडा विचार केला तर जाणवेल ह्यांत काहीच आश्चर्यजनक नाही.        लॉकडाऊनच्या आधीचा काळ, ज्याला आपण साधारण काळ म्हणू , त्यांत केस कापणे, दाढी ह्याची वाढती डिमांड होती. सप्लाय अर्थातच वाढत होता कारण शहरांची वाढ , तरुणांची मोठी संख्या , वारंवार केशरचना अनुरूप करण्याची गरज ह्यामुळे डिमांड वाढत होती आणि त्या अनुषंगाने सप्लाय. महाराष्ट्रात , विशेषतः महानगरांत अन्य राज्यातील नाभिकही मोठ्या संख्येने होते.        किंबहुना ह्या वाढणाऱ्या नाभिकांच्या संख्येने भाव पडू नयेत म्हणून नाभिक संघटना दर निश्चिती करते. साधारण वर्षा-दोन वर्षांत जीवनमानाचा खर्च वाढतो त्याच्या प्रमाणात हे दर वाढतात. ...