पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकल ट्रेनचा बारमाही मरणऋतू आणि आपले शहाणपण

  आज म्हणजे ९ जून २०२५ रोजी पाच लोक ट्रेनमधून पडून मेले आहेत. तसे एक-दोन रोजच मरत आहेत. काही वर्षांपूर्वी, अगदी दसऱ्याच्या काही दिवस आधी ३० एक लोक रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरीत मेले आहेत. विकासाच्या रथाला असे किडूक मिडूक बळी लागणार अशीच आपली भूमिका असली पाहिजे. कारण नाहीतर आपल्याला विचार करायला लागणार आणि ती गोष्ट आपल्या बौद्धिक, व्याख्याने , आणि सोशल मिडीयाला चटावलेल्या मेंदूला त्रासदायक ठरू शकते. तर ज्यांना हा त्रास करून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या जोखमीवर पुढे वाचावे. पहिली बाब म्हणजे लोकल ट्रेन्स ही मुंबईची लाइफलाईन नाही. तो मुंबईचा आजार आहे. आणि मुंबईचा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जी मुंबईची नाजायज अपत्ये असलेली शहरे किंवा धर्मशाळा आहेत त्यांचा तो आजार आहे. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे १८७० पासून , मुंबईच्या केंद्रवर्ती भागातील गर्दी बाहेर फेकायचा उपाय म्हणून ट्रेन्स वापरल्या गेल्या आहेत. आजही लोकल ट्रेन आणि मेट्रो हेच, म्हणजे मुंबईतील एलिट आणि धनाद्य कुटुंबांची घरे स्वस्त करणे आणि जीवनाची गुणवत्ता वाढवणे , हेच काम करत आहेत. शहरीकारणाचा थोर अभ्यास असलेले...

लोक, अनाहूत परिणाम, आणि सामाजिक हित

  २ एप्रिल २०२२ , म्हणजे गुढीपाडवा २०२२ पासून मागची २ वर्षे सक्तीचा असलेला मास्कचा वापर ऐच्छिक झालेला आहे. २०२१ मधल्या डेल्टा लाटेच्या आठवणी अजून तितक्या पुसट झालेल्या नाहीत. ही लाट यायच्या आधी, जानेवारी २०२१ च्या आसपास सुटलो ह्या महामारीच्या विळख्यातून असाच आपल्या सगळ्यांचा नूर होता. तसं वाटत होतं आणि डेल्टा लाट आली. अशा बोलाफुलाला गाठ कशाला अशा भावनेने आपण आता सुटलो महामारीच्या विळख्यातून असं म्हणायला धजावणार नाही. पण आपलं वागणं आपलं मोकळेपण दाखवतं आहेच.             लोकांचे वैयक्तिक निर्णय आणि सामाजिक हित ह्यांच्यात काय संबंध असतो हे कळायला कोव्हीड काळातला मास्कवापर आणि त्यासंबंधीचे निर्णय हे एक चांगले उदाहरण आहे. मुळांत मास्क ह्या वैयक्तिक परीधानाबाबत सरकारला नियम का करायला लागला हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मास्क वापरणे हे कोव्हीड होण्याची शक्यता कमी करणे आहे हे बहुतेकांना कळत होते. जेव्हा केसेस वाढत होत्या तेव्हा लोक मास्कही अधिक प्रमाणात , अधिक गांभीर्याने (डबल मास्किंग, फेस शिल्ड इ.) वापरत होते. पण मास्क वापराचे परिण...