पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकल ट्रेनचा बारमाही मरणऋतू आणि आपले शहाणपण

  आज म्हणजे ९ जून २०२५ रोजी पाच लोक ट्रेनमधून पडून मेले आहेत. तसे एक-दोन रोजच मरत आहेत. काही वर्षांपूर्वी, अगदी दसऱ्याच्या काही दिवस आधी ३० एक लोक रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरीत मेले आहेत. विकासाच्या रथाला असे किडूक मिडूक बळी लागणार अशीच आपली भूमिका असली पाहिजे. कारण नाहीतर आपल्याला विचार करायला लागणार आणि ती गोष्ट आपल्या बौद्धिक, व्याख्याने , आणि सोशल मिडीयाला चटावलेल्या मेंदूला त्रासदायक ठरू शकते. तर ज्यांना हा त्रास करून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या जोखमीवर पुढे वाचावे. पहिली बाब म्हणजे लोकल ट्रेन्स ही मुंबईची लाइफलाईन नाही. तो मुंबईचा आजार आहे. आणि मुंबईचा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जी मुंबईची नाजायज अपत्ये असलेली शहरे किंवा धर्मशाळा आहेत त्यांचा तो आजार आहे. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे १८७० पासून , मुंबईच्या केंद्रवर्ती भागातील गर्दी बाहेर फेकायचा उपाय म्हणून ट्रेन्स वापरल्या गेल्या आहेत. आजही लोकल ट्रेन आणि मेट्रो हेच, म्हणजे मुंबईतील एलिट आणि धनाद्य कुटुंबांची घरे स्वस्त करणे आणि जीवनाची गुणवत्ता वाढवणे , हेच काम करत आहेत. शहरीकारणाचा थोर अभ्यास असलेले...

कर्नाटकातील कॉलेजांतील बुरखा/हिजाब वादाच्या निमित्ताने

  कर्नाटकातले हिजाब (आणि नकाब/बुरखा , ज्याचा फारसा उल्लेख होत नाही. पण योग्य संज्ञा बुरखा हीच आहे. ट्विटरवरच्या क्लिप्समध्ये विद्यार्थिनी अंगभर आणि चेहरा झाकणारा बुरखा घालत आहेत हे स्पष्ट आहे.) हे प्रकरण गाजते आहे. मुलींच्या शिक्षणापुढे हिजाबचा मुद्दा गौण आहे आणि त्यामुळे त्यांना हिजाब घातल्याने कॉलेजात प्रवेश नाकारला जातो आहे हे चूक आहे – अशी एक सर्वसाधारण मांडणी आहे. अशा प्रकरणात असतं तसं आपल्याकडे स्पष्ट डीटेल्स नाहीत. कदाचित ते कधीही येणारही नाहीत. Most realistic possibility – बुरखा घालणं ही बाब अशा कॉलेजातील नियमित बाब (स्टेटस को) नव्हती. मध्येच केव्हातरी ही बाब सुरु झाली. हिंदू वर्चस्ववादी विचारसरणीच्या बाजूने हा बदल मुस्लीम identity चे public space मध्ये assertion अशा पद्धतीने घेतला. असे assertion हे त्यांच्या राजकीय भूमिकेच्या विरोधात असल्याने (भारतात केवळ हिंदूच असे assertion करू शकतात , अन्य नाही अशी भूमिका) त्यांनी ह्या बदलाला विरोध सुरु केलेला आहे. जर कॉलेजात गणवेश असेल तर गणवेशाच्या नियम आणि संकेताशिवाय अन्य बाबी निषिद्ध ठरतात. मुद्दा हा आहे कि अनेकदा अशा नियम आण...