पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकल ट्रेनचा बारमाही मरणऋतू आणि आपले शहाणपण

  आज म्हणजे ९ जून २०२५ रोजी पाच लोक ट्रेनमधून पडून मेले आहेत. तसे एक-दोन रोजच मरत आहेत. काही वर्षांपूर्वी, अगदी दसऱ्याच्या काही दिवस आधी ३० एक लोक रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरीत मेले आहेत. विकासाच्या रथाला असे किडूक मिडूक बळी लागणार अशीच आपली भूमिका असली पाहिजे. कारण नाहीतर आपल्याला विचार करायला लागणार आणि ती गोष्ट आपल्या बौद्धिक, व्याख्याने , आणि सोशल मिडीयाला चटावलेल्या मेंदूला त्रासदायक ठरू शकते. तर ज्यांना हा त्रास करून घ्यायचा आहे त्यांनी आपल्या जोखमीवर पुढे वाचावे. पहिली बाब म्हणजे लोकल ट्रेन्स ही मुंबईची लाइफलाईन नाही. तो मुंबईचा आजार आहे. आणि मुंबईचा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जी मुंबईची नाजायज अपत्ये असलेली शहरे किंवा धर्मशाळा आहेत त्यांचा तो आजार आहे. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे १८७० पासून , मुंबईच्या केंद्रवर्ती भागातील गर्दी बाहेर फेकायचा उपाय म्हणून ट्रेन्स वापरल्या गेल्या आहेत. आजही लोकल ट्रेन आणि मेट्रो हेच, म्हणजे मुंबईतील एलिट आणि धनाद्य कुटुंबांची घरे स्वस्त करणे आणि जीवनाची गुणवत्ता वाढवणे , हेच काम करत आहेत. शहरीकारणाचा थोर अभ्यास असलेले...

त्रिपुरदमन सिंग ह्यांचे ‘ सिक्स्टीन स्टॉर्मी डेज’

इमेज
         हे तसं अगदी नवं पुस्तक नाही. पुस्तक प्रकाशित झाल्याला ६ महिने उलटून गेलेले आहेत. पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा लेखकाचा वेबि ना र श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फौंडेशनने ठेवला होता. तिथे लेखक सोडून सगळ्यांचा सूर ‘आली नेहरूंची पापे बाहेर’ असा होता. बदलत्या राजकीय ताकदीचे एक लक्षण म्हणजे अशी पुस्तके असा विचार करून मी पुस्तक लक्षात ठेवलं होतं.        मग एकदम दुसऱ्या टोकाच्या अमित वर्माच्या podcast मध्ये जेव्हा लेखक आला तेव्हा माझं पुस्तकाबद्दलचं कुतूहल वाढलं. आमच्या विरोधकांची लक्तरे असं प्रचारकी पुस्तक नसून त्यात काही मांडणी आहे हे त्या podcast मधून जाणवतं. काय आहे ही मांडणी ? तर – पहिली संविधानदुरुस्ती यायच्या सुमारे दीड वर्षे अगोदर भारतीय संविधान हे नागरीकांचे मूलभूत हक्क सर्वतोपरी मानणारे आहे होते. म्हणजे संविधानाचा अर्थ लावण्याची जबाबदारी असलेल्या न्यायालयांनी संविधान असे आहे असे वारंवार स्पष्ट केले होते. पहिल्या घटनादुरुस्तीने नागरिकांचे हक्क (ज्यांत प्रामुख्याने त्यांची स्वातंत्र्ये आहेत) हे दुय्यम महत्वाचे केले आणि त्या...